सर्वात जास्त पैसे घेणाऱ्या या अभिनेत्याने केले लग्न

मित्रानो भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात लग्न करणे हि एक प्रथा आहे. प्रत्येकाचे लग्न वेगवेगळ्या पद्धतीने होत असते कारण प्रत्येकाचे रीतिरिवाज वेगवेगळे असतात. लग्नाचं बंधन हे पवित्र बंधन मानलं जात आणि लोक लग्नबेडीत अडकतात. अनेक मोठ्या दिग्गजांनी २०१८ मध्ये लग्न केले तसेच २०१९ मध्ये देखील अनेक लग्न झाले आहेत. बॉलिवूड मधील लग्नाच्या चर्चा तर रंगत असतातच. अश्याच एका हॉलिवूड मधील मोठ्या दिग्गजाने लग्न केले आहे. त्या अभिनेत्याची ओळख जगभरात आहे.

डब्लूडब्लूई मधून सर्वांच्या झोपा उडवणारा ‘द रॉक’ म्हणजेच ‘ड्वेन जॉन्सन’ याने लग्न केले आहे. आपले पिळदार शरीर, आणि व्यक्तिमत्वाने रॉक चे फॅन जगभर आहेत. असा कोणी नसेल ज्याला द रॉक माहित नसेल. खूप दिवसांपासून प्रेयसी असणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंड ‘लॉरेन हॅशियन’ सोबत रॉक ने लग्न केले आहे. हे लग्न विमानात झाले असल्याची मोठी चर्चा आहे. रॉक ने लग्न केलेली तरुणी लॉरेन हि ३४ वर्ष्यांची आहे. रॉक पासून लॉरेन हिला दोन मुलं देखील आहेत. परदेशात लग्नापूर्वी मुलं देखील असतात.रॉक ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करून स्वतः याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. लाखो चाहते असणाऱ्या रॉक ला जगभरातून लग्नाच्या शुभेच्या लोक देत आहेत. तुमच्या माहितीनुसार सांगू इच्छितो कि, जगभरात सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमधून रॉक एक आहे. आपण देखील रॉक ला लग्नाच्या शुभेच्या देऊ आणि भावी आयुष्यासाठी देखील त्याचे अभिनंदन करू. रॉक च्या चाहत्यांसाठी हि एक आनंदाची बातमी आहे. २ में १९७२ साली जन्मलेला रॉक हा सध्या ४७ वर्ष्यांचा आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *