लग्नाचं वचन देऊन शारीरिक सम्बन्ध गुन्हा नाही : सुप्रीम कोर्टाचा निर्णय

मित्रानो सध्या कोणीही कोणाशीही शारीरिक संबंध ठेवत. मात्र दोघांमध्ये वाद झाल्यावर बलात्काराची केस टाकून फसवणूक झाल्याच्या तक्रारी महिला करतात. अशीच एक केस सेल्स टॅक्समध्ये सहाय्यक आयुक्त महिलेमी केली होती. मात्र पुढे आपले काही होऊ शकत नाही म्हणजेच त्यांचे लग्न होऊ शकत नाही हे माहित असून देखील त्यांनी शारीरिक सम्बन्ध केले तर हा बलात्कार ठरू शकत नाही. अनेक मुलींचे लग्न झालेल्या तरुणांसोबत अफेअर असते मुलं देखील लग्नाचं वाचन देऊन शारीरिक सम्बन्ध बनवतात. पण पुढे लग्न होणार नाही हे माहित असून देखील शारीरिक सम्बन्ध केले तर तो बलात्कार ठरणार नाही.
न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी सेल्स टॅक्समध्ये सहाय्यक आयुक्त महिलेची याचिका या आधारावर फेटाळली. या संबंधांमुळे पुढे काही साध्य होणार नाही, हे महिलेला माहित असूनही तिने परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवले तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत परस्पर सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना लग्नाचं खोटं वचन देऊन बलात्कार केला, असं बोलता येणार नाही.
कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, “दोघांचे आठ वर्षांपेक्षा जास्त काळ प्रेमसंबंध होते. या काळात दोघे अनेकदा एकमेकांच्या घरी थांबले, यावरुन हे स्पष्ट होतं की, हे संबंध परस्पर सहमतीने बनले होते.” महिलेचे म्हणणे आहे कि, ती सीआरपीएफच्या अधिकाऱ्याला १९९८ पासून ओळखत होती. २००८ मध्ये लग्नाचं वचन देऊन अधिकाऱ्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे २०१६ पर्यंत दोघांमध्ये संबंध होते आणि यादरम्यान ते अनेक दिवस एकमेकांच्या घरीही राहिले होते.
तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे की, “२०१४ मध्ये अधिकाऱ्याने जातीच्या आधारावर माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला.” यानंतरही दोघांमध्ये २०१६ पर्यंत संबंध होते. अधिकाऱ्याने दुसऱ्या महिलेसोबत साखरपुडा केल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलेने २०१६ मध्ये अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. यावर कोर्टाने म्हटले कि, वचन देणं आणि काही परिस्थितीत ते पूर्ण न करणं याला फसवणूक करणं असं म्हणता येणार नाही. लग्नाचं खोटं वचन देऊन एखाद्या पुरुषाचा इरादा महिलेचा विश्वास संपादन करण्याचा असतो. खोटं वचन देऊन महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणं आणि परस्पर सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणं याबाबत चुकीचा समज आहे. खोटं वचन देऊन फसवणूक करणं ही अशी स्थिती आहे, ज्यात वचन देणाऱ्या पुरुषाच्या मनात शब्द देताना तो पाळण्याचा इरादाच नसतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *