महाराष्ट्रातल्या या माणसाने बनवलं प्लास्टिक बाटल्यां पासून बंगला

मित्रानो प्रत्येकाचं स्वप्न असत कि आपलं स्वतःच मोठं घर असावं. अनेकजण शहरात कमला येतात नोकरी करतात व आयुष्यभराची कमाई घर घेण्यात घालवतात. काहींचं घर घेण्याचं स्वप्न लवकर पूर्ण होत तर काहीच उशिरा तसेच काही जण घर घेण्यात असमर्थ राहतात. अनेकांना आरामदायी आणि सुखसोई असणार घर हवं असत तर काहींना निवार्यापुरतं चांगलं घर मिळावं यासाठी धडपड होत असते. घर बनवण्यासाठी सिमेंट, लोखंड याचा तर वापर जास्त असतोच मात्र अमरावतीमध्ये एका व्यक्तींनी अनोखं घर बांधलं आहे.

अमरावतीमध्ये एका व्यक्तीने प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करून दोन बीएचके घर बांधलं आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून उत्तम घर बनवलं असल्याने याची चर्चा अमरावतीमध्ये तर होत आहेच मात्र त्याचे फोटो सोशल मीडियावर देखील वायरल होत असून त्या व्यक्तीचे कौतुक केले जात आहे.अमरावतीमधील राजुरा या गावामध्ये राहणाऱ्या ‘नितीन उसगावकर’ यांनी हा अनोखा कारनामा केला आहे.नितीन उसगावकर यांनी जे घर बांधले यासाठी जवळपास २४ महिने लागले. या घरासाठी पंधरा हजारांच्या वर बाटल्या वापरल्या गेल्या. नितीन उसगावकर याना इंटरनेटवर याविषयी माहिती मिळाली होती आणि त्यानंतर आपलं अनोखं घर उभारण्यासाठी त्यांनी दोन वर्षे मेहनत घेतली. बांधकामासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा ३१ टक्के खर्च त्यांचा वाचला असून उत्कृष्ट घर बनवले गेले आहे. विटांचे बांधकाम करायला जास्त खर्च येतो मात्र हे बाटल्यांचे घर बनवले असल्याने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट तर लागली त्यामुळे याला टाकाऊ पासून टिकाऊ म्हणजेच इकोफ्रेंडली घर म्हणता येईल. नितीन उसगावकर यांच्या घरापासून प्रेरणा घेऊन इतरांनी देखील असे घर बांधावे. अमरावती मध्ये बांधलेल्या या घराला पाहण्यासाठी लोक गर्दी देखील करत आहेत. या घरापासून प्रेरणा घेण्यासारखे आहे म्हणून नितीन उसगावकर यांच्या कल्पनेला आणि जिद्दीला सलाम.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *