या मराठमोळ्या अभिनेत्रीने एक महिन्यापूर्वीच केला लपून साखरपुडा

मित्रानो सेलिब्रिटी लोक कोणाशीही लग्न करतात. जात, धर्म, नातं काहीच न पाहता सेलिब्रिटी कोणाशीही लग्न करतात. प्रेम आंधळं असत हे मान्य आहे मात्र त्याला देखील काही मर्यादा असतात. अनेक अभिनेत्र्यांनी किंवा अभिनेत्यांनी लपून लग्न केले आहेत आणि नंतर त्याच गुपित उघड झालं आहे. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री आहे जिने लपून साखरपुडा केला आणि आता लोकांना त्यांच्याबद्दल समजू लागले. चला तर मग पाहूया कोण आहे ती अभिनेत्री जिने लपून साखरपुडा केला.

मित्रानो आज आपण मराठमोळी अभिनेत्री ‘नेहा पेंडसे’ विषयी बोलणार आहोत. २९ नोव्हेंबर १९८४ ला जन्मलेली नेहा आता ३४ वर्ष्यांची फिटनेस असणारी आकर्षक तरुणी आहे. मध्यन्तरी जरी नेहा जाड झाली असली तरी तिने आता पुन्हा आपलं शरीर आकर्षक आणि फिट ठेवलं आहे. झी मराठी वाहिनीवर लागणाऱ्या “भाग्यलक्ष्मी” मालिकेमध्ये नेहाने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. नेहाने मराठी, तेलगू, मल्याळम, आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. टीव्ही विश्वात वादग्रस्त असणारा रियलिटी शो ‘बिग बॉस १२’ मध्ये नेहा पेंडसे झळकली होती. मिळालेल्या माहितीनुसार नेहाने १ जुलै २०१९ ला साखरपुडा केला असल्याचे समजून येते. खूप दिवसांपासून नेहा शर्दुल सिंह ला डेट करत होती आणि त्यांनी साखरपुडा केल्याची बातमी लपून ठेवलेली होती. समोर आलेल्या फोटोंमध्ये प्रियकर शर्दुल सिंह च्या कुटुंबात नेहा खूप रमल्यासारखी दिसते आहे. शर्दुल सिंह च्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर झालेले फोटो त्याचा पुरावा देत.जेव्हा नेहाच्या बोटांमध्ये साखरपुड्याची अंगठी दिसली तेव्हा या गोष्टीची खूप चर्चा झाली. फोटो समोर येताच नेहाचा बॉयफ्रेंड शर्दुल सिंह याच्या लठ्ठपणाची लोकांनी खिल्ली उडाली. चाहत्यांनी कमेंट केली कि, याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळाला असता. अनेकजण तर शर्दुल सिंहला नेहाचा भाऊ म्हणू लागले. अनेकांना शर्दुल सिंह हा मुलगा पसंत आला नाही मात्र काहींनी असा अंदाज लावला कि, नेहा पैश्यांसाठी शर्दुल सिंह सोबत राहण्याचा निर्णय घेत असेल आणि पुढील जीवन आनंदी व मौजमजेचा घालवायचे असेल. काहीही असले तरी हा तिचा वयक्तिक प्रश्न आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *