NMJOKE

या अभिनेत्रींचे झाले निधन, बॉलिवूड मध्ये पसरली शोककळा

मित्रानो बॉलिवूड मध्ये अनेक दिग्गज अभिनेते आले आणि जग सोडून गेले. मागच्या वर्षी २०१८ मध्ये श्रीदेवी ने जग सोडले आणि देशभर शोककळा पसरली. असेच अनेक अभिनेते हे जग सोडून गेले काही दिवसांपूर्वीच रितिक रोशनचे आजोबा यांचं निधन झालं. आता नवीन बातमी समोर येत आहे ज्यामुळे बॉलिवूड मध्ये शोककळा पसरली आहे. मागच्या जमान्यात लोकप्रिय असलेली अभिनेत्री विद्या सिन्हा च मुंबईत गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झालं.

काही दिवसांपूर्वी गंभीर अवस्थेत मुंबईतील जुहू च्या एका रुग्णालयात विद्या याना ठेवले होते. विद्या काही दिवसांपासून टीव्हीवरील मालिकांमध्ये काम करत होत्या. विद्या याना व्हेंटिलेटर वर ठेवले होते मात्र शेवटी १५ ऑगस्ट ला त्यांनी शेवटचा श्वास घेतला. विद्या सिन्हा याना फुफुसांचा आजार होता आणि हृदयाचा आजार देखील होता त्यामुळेच त्यांना व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. १८ वर्ष्यांच्या असतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रात काम सुरु केलं होत. चित्रपट आणि मालिकांमध्ये येण्यापूर्वी विद्या मॉडेलिंग करायच्या आणि त्या मिस बॉम्बे देखील राहिल्या आहेत. ‘रजनीगंधा’, ‘हवस’, ‘छोटी सी बात’, ‘मेरा जीवन’, ‘इनकार’, ‘जीवन मुक्त’, ‘किताब’, ‘पति पत्नी और वो’, ‘तुम्हारे लिए’, ‘सबूत’ असे अनेक सिनेमे त्यांनी केले. संजीव कुमार सोबत त्यांचं गाणं ‘ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए’ हे खूपच गाजल होत. टीव्ही इंडस्ट्री सोबत देखील विद्या यांचं नातं चांगलं आहे कारण त्यांनी ‘काव्यांजलि’, ‘जारा’, ‘नीम नीम शहद शहद’, ‘कुबूल है’, ‘इश्क का रंग सफेद’ आणि ‘चंद्र नंदिनी’ यामध्ये देखील काम केले. विद्या च वयक्तिक आयुष्य देखील अडचणींनी भरलेलं होत. ९ जानेवारी २००९ साली त्यांनी दुसरा नवरा नेताजी भीमराव च्या विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली होती. शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता, त्यानंतर त्यानी घटस्फोट घेतला. नेताजी भीमराव च्या पूर्वी विद्या ने वेंकटेश्वर अय्यर सोबत लग्न केले होते. ते तमिळ ब्राह्मण कुटुंबातील होते. विद्या ने वेंकटेश्वर सोबत १९६८ साली लग्न केले त्यानंतर १९८९ मध्ये एका मुलीला दत्तक घेतले जिचे नाव जान्हवी ठेवले. मुलगी दत्तक घेतल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. आज विदयाजी आपल्यात नाही त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना.
Exit mobile version