aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

चेहऱ्यावर चुकूनही नका लावू या ७ वस्तू, नाहीतर खराब होईल तुमची त्वचा

तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी चेहरा हा प्रमुख भूमिका निभावतो. चेहऱ्याला नेहमी सुंदर ठेवण्यासाठी तुमची स्किन हि निरोगी राहणे फार आवश्यक आहे. खूप वेळा इकडे-तिकडे वाचून किव्हा लोकांच्या गोष्टी ऐकून आपण चेहऱ्याला नवीन नवीन वस्तू लावून विविध-विविध प्रयोग करत असतो. पण हे प्रयोग तुम्हाला महाग सुद्धा पडू शकतात. तुम्हाला नेहमी स्किन स्पेशलिस्ट कडून विषिष्ट सल्ला घेतल्यानंतरच चेहऱ्यावर नवीन वस्तू लावण्याचा प्रयत्न केला पाहिजेत अन्यथा नाही. आज आम्ही तुम्हाला अश्याच ७ वस्तू सांगणार आहोत ज्या चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या स्किनचे नुकसान होऊ शकते.

१) व्हिनेगर : चेहऱ्यावर कधीच व्हिनेगर डायरेक्ट नाही लावले पाहिजेत. कारण ह्यामध्ये काही पप्रमाणात ऍसिड सुद्धा असते, जे तुमच्या स्किन वर इन्फेक्शन किव्हा जखम सुद्धा करू शकते. जरी तुम्हाला हे लावायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी मिसळून तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. २) बियर : चेहऱ्यावर बियर सांडण्यापासून स्वतःचा बचाव केला पाहिजेत. कारण बियर मध्ये ऍसिडिक तत्व असतात, जे तुमच्या चेहऱ्याची चमक कमी करतात. आणि ह्याला लावल्याने तुमची स्किन ड्राय होऊन जाते. एवढाच नव्हे तर तुम्ही ह्याला जास्त प्रमाणात लावले तर ह्यामुळे चेहऱ्यावर फोड्या येण्याची संभावना वाढते. म्हणून जर कोणी तुम्हाला ब्यूटी टिप्स म्हणून बियर लावण्यास सांगत असेल तर तुम्ही चुकून देखील तुमच्या चेहऱ्यावर बियरचा प्रयोग करू नका.३) बेकिंग सोडा – काही लोकं ब्यूटी टिप्स म्हणून चेहऱ्यावर बेकिंग सोडा लावण्याचा सल्ला देतात. पण ह्याला जास्त प्रमाणात लावल्याने चेहऱ्याचा रंग फिका पडू लागतो. त्याचबरोबर ह्यामध्ये असलेले लेड तुमच्या चेहऱ्यावर पुरळ आणतात. ४) पुदीना – पुदिन्यामध्ये मेन्थॉल असते, जे चेहऱ्याला लावल्याने तुमचा चेहरा लाल होऊन जातो. ह्याला अतिरिक्त प्रमाणात चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे सावळेपण वाढू लागते. काही बाबींमध्ये असे दिसून येते कि, पुदिना लावल्याने काही लोकांना चेहऱ्यावर फोड्या येऊ लागतात.५) टूथपेस्ट – इंटरनेटवरील विविध-विविध साईट्सवर काही लोकं चेहऱ्यावर टूथपेस्ट लावण्याचा सल्ला देतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो कि टूथपेस्ट चा चेहऱ्यावर प्रयोग केल्याने चेहऱ्यावर बारीक बारीक छिद्रे पडण्याची दात क्षमता आहे म्हणून टूथपेस्ट चेहऱ्यावर लावण्याआधी नीट विचार करा. ६) बॉडी लोशन – काही लोकांची सवय असते कि ते बॉडी लोशन चेहऱ्यावर सुद्धा लावतात आणि हे केल्याने त्यामधील हानिकारक रसायने तुमच्या चेहऱ्याला नुकसान पोहचवू शकतात. म्हणून चेहऱ्यावर फक्त फेस क्रीमचा वापर करा. ७) व्हॅसलीन – व्हॅसलीन ला चेहऱ्यावर लावल्याने धुळीचे कण चेहऱ्यावर लवकर आकर्षित करून घेतात. ह्याला लावल्याने त्वचेवरील रोम छिद्रे बंद होऊ लागतात आणि त्वचा खराब होऊ लागते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *