NMJOKE

माता सीता ने रावणाला सांगितल्या होत्या या तीन गोष्टी, माणसांनी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात

महर्षि वाल्मीकि द्वारा रचलेले ‘रामायण’ हिंदू धर्म मधील महान ग्रंथांमधून (महाकाव्य) एक आहे. हा फक्त एक ग्रंथ नसून जीवन जगण्याचा आधार आहे. भगवान श्री विष्णूंनी रावणाचा अंत करण्यासाठी श्री रामाचा अवतार घेतला होता, हे वर्णन ह्या ग्रंथातच लिहिले आहे, ह्या व्यतिरिक्त माता लक्ष्मी नी सीता चा अवतार घेतला होता याचा उल्लेख देखील याच ग्रंथामध्येच आहे. जेव्हा रावणाने सीतेचे हरण केले आणि त्यांना अशोक वाटिका मध्ये बंदी बनवून ठेवले, ह्या दरम्यान माता सीता ने रावणाला ह्या तीन महान ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या होत्या ज्या प्रत्येक व्यक्तीने आठवणीत ठेवल्या पाहिजेत, कारण हेच जीवनाचे सत्य आहे.

प्रथम वचन : परक्या स्त्रियांवर नजर ठेवणारा मनुष्य सर्वात मोठा पापी असतो. अश्या मनुष्याला नर्कामध्ये सुद्धा जागा नाही भेटत आणि त्यांच्या आत्म्याला कधीच मुक्ती नाही भेटत. हे माता सीता ने रावणाला त्या वेळेस सांगितले होते, जेव्हा तो माता सीतेचे हरण करून त्याच्या पुष्पक विमानातुन घेऊन जात होता.द्वितीय वचन : जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंत येतो तेव्हा त्याला दुसऱ्यांकडून सांगितल्या गेलेल्या, त्याच्या बद्दलच्या गोष्टी सुद्धा त्याला खराब लागतात. हि गोष्ट माता सीता ने रावणाला त्या वेळेस सांगितलेली जेव्हा तो माता सीता समोर लग्नाचा प्रस्ताव मांडतो आणि माता सीता त्याच्या ह्या प्रस्तावाला नकार देते व त्याला भगवान रामाला शरण येण्यास सांगते,पण रावण शरण येण्यास नकार देतो.तृतीय व अंतिम वचन : जो मनुष्य आपल्या शत्रूला स्वतःहून कमकुवत आणि कमजोर समजतो, तो कधीच त्याच्या शत्रूला पराभूत करू शकत नाही. अश्या वृत्तीचा मनुष्य स्वतः आपल्या पराभवाचे कारण बनतो. हि गोष्ट सीता ने रावणाला त्या वेळेस सांगितली होती, जेव्हा रावण भगवान रामासोबत युद्ध करण्यास जात होता व तो अशोक वाटिका मध्ये सीतेला बोलत होता कि तो रामाचा वाढ करण्यास जात आहे.
Exit mobile version