NMJOKE

भारताच्या मोठ्या मोठ्या खेळाडूचां आहे सरकारी नोकरी सोबत संबंध

आपल्या देशातील क्रिकेटर्स त्यांच्या काबिलीयत आणि कौशल्यमुळे संपूर्ण देशात ओळखले जातात. भारतीय क्रिकेटर्स नेहमीच चर्चेमध्ये असतात व मैदान मध्ये खेळाविषयी त्यांच्या बातम्या तर येतच असतात पण त्यांच्या खासगी जीवनाविषयी सुद्धा काही गोष्टी बातम्यांद्वारे ऐकायला मिळत असतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अश्या खेळाडूंविषयी सांगणार आहोत, ज्यांना क्रिकेट खेळण्या व्यतिरिक्त सन्मान म्हणून सरकारी नौकरी पण दिली गेली आहे. त्यांची नवे खालील प्रमाणे आहेत.

१. सचिन तेंडुलकर : ह्या कॅटलॉग मध्ये सर्वात पहिल्या नंबर वर क्रिकेट चे देवता म्हणजेच सचिन तेंडुलकर आहेत. सचिन तेंडुलकरला भारतीय वायुदलाने सन्मानित करत असताना साल २०१० मध्ये त्यांना ग्रुप कॅप्टन बनवले होते. सचिन तेंडुलकर ची इच्छा आहे कि त्यांचा मुलाने वायुदलामध्ये जावे व त्यांचा मुलगा म्हणजेच अर्जुन हा फक्त १६ वर्षीय असून त्याला वायुदला मध्ये शामिल होण्यासाठी रस सुद्धा आहे.२. महेंद्र सिंग धोनी : भारतीय क्रिकेट टीम मधील सर्वात यशस्वी कॅप्टन मध्ये मोजले जाणारे महेंद्र सिंग धोनीला साल २०१५ मध्ये इंडियन आर्मी मधील ‘लेफ्टनंट कर्नल’ या पदासाठी नियुक्त केले होते. धोनी विषयी एक गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल कि, ते भारताच्या टीम मध्ये शामिल होण्या आधी ट्रेन मध्ये नोकरी करत होते. त्याचबरोबर ते चांगले फुटबॉल प्लेयर होते व ते आपल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये फुटबॉल स्पर्धेत गोलकीपर राहत होते, तसेच ते चांगले बॅडमिंटन प्लेयर होते आणि त्यांनी जिल्हा व तालुका स्तरिय स्पर्धा जिंकल्या आहेत.३. कपिल देव : कपिल देवने १९७५ साली प्रथम श्रेणीच्या क्रिकेट मध्ये प्रवेश घेतला होता. जगामध्ये भारताला क्रिकेटची जाणीव करून देण्याचे श्रेय जर कोणाला जाते, तर ते आहेत कपिल देव. कपिल देवने १९८३ साली भारताला पहिला वर्ल्ड काप जिंकून दिला होता. यानंतर भारतात लोकं क्रिकेटला महत्व देऊ लागले आणि पसंद करू लागले. कपिल देव यांना २००८ साली भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल बनवले गेले होते.४. हरभजन सिंग : हरभजन सिंग भारतीय क्रिकेट टीम मधील सर्वात यशस्वी स्पिनर राहीले आहेत व जेव्हा जेव्हा भारताचे सर्व फलंदाज बाद होत असतील तेव्हा हरभजन ने त्याच्या फलंदाजी ने भारताला चांगलय धावा मिळवून दिल्या आहेत. हरभजन सिंग हे मूळचे पंजाबला राहणारे आहेत व त्यांना पंजाब पोलीस मध्ये डीएसपी हे पद देण्यात आले आहे.५. उमेश यादव : उमेश यादव भारतीय टीममध्ये बॉलिंग करतात, ते उजव्या हाताने जलद चेंडू टाकतात. क्रिकेटमध्ये करियर करण्याआधी त्यांनी सेने व पोलिसांमध्ये भरती होण्यासाठी अर्ज दाखल केला होता, पण ते अयशस्वी ठरले. २००७-२००८ साली ते पहिल्यापासूनच टेनिस बॉल क्रिकेट खेळात होते, उमेश ने सुरुवातीस चमड्याच्या बॉलने बॉलिंग सुरु केली होती व विदर्भ मध्ये शामिल झाले व हळू-हळू त्यांच्या प्रवास भारतीय टीम पर्यंत येऊन पोहोचला. उमेश यादवला २०१७ साली, रिजर्व बैंक ऑफ इंडिया बँकमध्ये ‘सहाय्यक व्यवस्थापक’ या पदासाठी नियुक्त केले होते.
Exit mobile version