बजरंगी भाईजान मधली मुन्नी आता दिसू लागली आहे खूप सुंदर, पहा तुम्हीच

बॉलीवुड मधील ब्लॉकबस्टर चित्रपट “बजरंगी भाईजान” मधील मुन्नीची भूमिका साकारणारी हि लहान मुलगी तर तुम्हाला सर्वांना आठवणीत असेलच. ह्या चित्रपटात तिने बॉलीवुड चे सुपरस्टार सलमान खान सोबत काम केले होते व तिचा हा पहिलाच चित्रपट होता. ह्या मुलीचे खरे नाव हर्षाली मल्होत्रा आहे. जेव्हा हर्षालीने बजरंगी भाईजान चित्रपटात काम केले, तेव्हा ती फक्त ६ वर्षीय होती व तिने चित्रपटामध्ये एका मुक्या मुलीची भूमिका साकारली आहे, जीचे घर पाकिस्थानला असते पण ती व तिची आई भारतामध्ये मुन्नीच्या आवाजावर उपाय शोधायला येतात व मुन्नी भारतामध्ये हरवून जाते.

दर्शकांच्या भेटीस बजरंगी भाईजान १७ जुलै २०१५ साली चित्रपटगृहात आली व त्यानंतर हा चित्रपट पहिल्यांदा स्टार प्लस वर दाखवला गेला. ह्या चित्रपटाने १५.५ एवढी टीआरपी मिळवून, ३ इडियट्स च्या मागील टीआरपी चा रेकॉर्ड ब्रेक केला. आज आम्ही तुम्हाला हर्षाली मल्होत्रा चे लेटेस्ट फोटोस दाखवणार आहोत, जे तुम्ही अगोदर पाहिले नसतील.तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, हर्षाली मल्होत्रा चा जन्म ३ जून २००८ साली मुंबई, महाराष्ट्र मध्ये झाला आहे. हर्षाली ने आपल्या अभिनयाची सुरुवात २०१५ साली बजरंगी भाईजान ह्या चित्रपटापासून केली होती. ह्या चित्रपटात तिने एका पाकिस्थानी मुस्लिम मुलीची भूमिका निभावली होती. ह्या चित्रपटासाठी हर्षालीला ५००० मुलींच्या ग्रुप मधून निवडले होते, ज्या ऑडिशन देण्यासाठी आल्या होत्या.बजरंगी भाईजान मध्ये आपल्या तल्लख आणि धमाकेदार प्रदर्शनामुळे, हर्षालीला विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले , त्याचबरोबर फिल्मफेयर पुरस्कार सर्वोत्कृष्ट स्त्री पदार्पणासाठी हर्षालीला नामनिर्देशित केले होते. चित्रपटांच्या व्यतिरिक्त हर्षालीने टीव्ही सीरिअल ‘कबूल है’ आणि ‘लौट आओ तृषा’ मध्ये सुद्धा अभिनय केला आहे.बजरंगी भाईजान हि सलमान खानच्या करियर मधील सर्वात यशस्वी चित्रपटांमधून एक आहे, जवळपास ९० करोड च्या बजेटने तयार झालेल्या ह्या चित्रपटाने ६२९ करोड हुन अधिक रुपयांचा गल्ला जमा केला होता. ह्या चित्रपटाचे संचालक कबीर खान आहेत. सलमान खान सोबत करीन कपूर देखील काम करत होती व नवाजुद्दीन सिद्दीकी सहाय्यक अभिनेते म्हणून चित्रपटात झळकले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *