मुलींनो कपडे दुकानात बदलून पाहत असाल तर सावधान, पहा काय घडलं ते

मित्रानो आजच्या आधुनिक युगात सर्वच अगदी सोप्प झालं आहे. मोबाईल आल्यामुळे त्याला कॅमेरे देखील अगदी उत्तम आले आहेत. कोणीही आजकाल व्हिडीओ शूट करून आपली बाजू सिद्ध करू शकत. मात्र या मोबाईलचे व आधुनिक कॅमेर्यांचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे नुकसान देखील भयानक आहेत. महिलेना याचा मोठा त्रास भोगावा लागू शकतो कारण महिलांची अब्रूच सर्वकाही असते. पण याचच सार्वजनिकीकरण झालं तर परिणामी तिची बदनामी होते व ती आत्महत्या देखील करू शकते.

नागपुरात अशीच एक घटना घडली आहे मात्र महिलेच्या शौर्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला. नागपूरमधील सीताबर्डी बाजारात असणाऱ्या एका गारमेंट्सच्या दुकानात चेंजिंग रूम मध्ये व्हिडीओ काढताना सापडलं आहे. दुकानदाराने महिलांच्या चेंजिंग रूम मध्ये मोबाईलचा कॅमेरा सुरु ठेऊन तरुणीचे अश्लील व्हिडीओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. एक तरुणी या गारमेंट्सच्या दुकानात गेली होती त्यावेळी चेंजिंग रूम मध्ये कपडे व्यवस्थित येतात का हे पाहायला ती गेली. कपडे बदलत असताना तिने तिथे लपवलेला मोबाईल पहिला.
मोबाईलमध्ये तिने स्वतःचे कपडे बदलतानाचा व्हिडीओ पहिला व तिने दुकानदाराला तक्रार केली. सुरुवातीला दुकानदाराने सांगितले कि तुम्ही जर पोलीस कम्प्लेंट केली तर तुमचीच बदनामी होईल. मात्र तरुणीने त्यांच्या धमकीला न घाबरता पोलिसात तक्रार केली. दुकानातील नोकर नितीन नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. दुकानातील मालकाची जामिनावर सुटका झाली आहे मात्र गुन्हा दोघांवरही दाखल केला गेला आहे. पोलीस आणखीन तपस करत आहेत कि, आणखीन किती मुली याच्या आहारी गेल्या आहेत का.मित्रानो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, मुलींनी चेंजिंग रूम मध्ये शक्यतो चेंज करूच नाही आणि जरी चेंज केले तरी छुपा कॅमेरा वगैरे आहे का हे सुरुवातीला तपासावे. जर अश्या वस्तू आढळ्यास घाबरून न जाता पोलिसात तक्रार करावी. अनेक जण हौस म्हणून व्हिडीओ काढतात तर काही जण असे व्हिडीओस विकून पैसे देखील कमावतात मात्र त्यामुळे मुलींची अब्रू जाते आणि त्या आत्महत्या देखील करू शकतात. आपले अंडरगारमेंट्स तर दुकानात कधीच चेंज करून पाहू नयेत असे आम्हाला वाटते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *