ह्रितिक रोशन च्या घरावर पसरली शोककळा, यांचे झाले निधन

मित्रानो भारताच्या मोठ्या नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर आता हृतिक रोशन यांच्या रोशन कुटुंबावर देखील शोककळा पसरली आहे. मागील वर्षी देखील अनेक मोठे तारे हे जग सोडून गेले होते. सर्वानाच एक दिवस जग सोडून जायचं आहे मात्र अनेक लोक अशी असतात जी मृत्यूनंतरही हयात असल्यासारखे वाटतात तसेच ते गेले आहेत असे वाटत देखील नाही. लक्ष्मीकांत बेर्डे, रीमा लागू असे दिग्गज कलाकार अजूनही हयात असल्यासारखे वाटते. अभिनेता हृतिक रोशन चे आजोबा आणि मोठे निर्माते जे ओमप्रकाश यांचं निधन झालं आहे.

जे ओम प्रकाश हे ९२ वर्ष्यांचे होते त्यामुळे वयाच्या अभावी त्यांचं निधन झालं. रोशन कुटुंबासाठी हे शोक व्यक्त करण्याचे क्षण आहेत. या दुःखाच्या वेळी ऋतिक रोशन ची एक्स वाइफ सुजैन रोशन च्या घरचे लोक देखील आले होते. जे ओम प्रकाश यांच्या पार्थिवाला त्यांचे जावई राकेश रोशन यांनी खांदा दिला. रोशन परिवारानेच त्यांचे सर्व काही विधी प्रामुख्याने पुढाकार घेऊन पार पडले. हृतिक आपल्या आजोबांच्या खूप जवळ राहिलेला आहे. सुपर ३० चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हृतिक म्हणाला होता कि आजोबाच माझे मोठे शिक्षक आहेत. या दुःखाच्या क्षणी हृतिक ची बहीण सुनैना रोशन देखील दिसली. रोशन कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त बॉलिवूड विश्वातील अनेक मोठे लोक जे ओम प्रकाश च्या अंतिम संस्कारासाठी आले होते. त्यामध्ये अमिताभ बच्चन, अभ‍िषेक बच्चन, धर्मेंद्र यांची नावे आहेत. अमिताभ बच्चन ने जे ओम प्रकाश यांच्या निधनामुळे दुखी होऊन सोशल मीडिया वर भावना व्यक्त केल्या. जे ओम प्रकाश ने आखिर क्यूं, आप की कसम, आई मिलन की बेला, आया सावन झूम के, आए दिन बहार के, आदमी खिलौना है यासारखे अनेक चित्रपट बनवले होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *