NMJOKE

छातीत नाही तर बॅगेत धधडत या महिलेचं हृदय, पहा

जीव मुठीत घेऊन चालणाऱ्या म्हणी तुम्ही भरपूर ऐकल्या असतील. पण काय खरच असे घडलेले पाहिले आहे का? कदाचित तुम्हाला ह्या गोष्टीवर विश्वास नाही बसणार, तर चला मंडळी आज आम्ही तुम्हाला एका अश्या महिलेची ओळख करून देणार आहोत जी आपले हृदय तिच्या बॅगमध्ये घेऊन फिरते. तुम्हाला हे वाचून कदाचित हसू आले असेल पण हेच सत्य आहे. तुम्ही विश्वास करा अथवा नका करू पण ह्या जगात एक अशी महिला देखील आहे जीचे हृदय छातीमध्ये नसून तिच्या बॅगमध्ये घेऊन फिरते.

काल पर्यंत ज्या गोष्टींना चमत्कार मानले जात होते, आज विज्ञानाने त्यालाच सत्यामध्ये उतरवले आहे. तुम्ही कृत्रिम हृदय लावून मनुष्याला जिवंत ठेवण्याच्या शस्त्रक्रियेबद्दल ऐकलेच असेल, जे आपल्यामध्येच एका चमत्कारापेक्षा कमी नाही. पण अलीकडे वैद्यकीय विज्ञानाने ह्याहून पलीकडे जाऊन एक असा करिष्मा केला आहे, ज्याला बघून पूर्ण जग हैराण झाले आहे. खरं तर हा वैद्यकीय विज्ञानाचा चमत्कारच आहे कि, ब्रिटन मध्ये स्थायिक असणारी 39 वर्षीय महिला जिचे नाव साल्वा हुसैन असे आहे आणि हिचे हृदय तिच्या शरीराच्या बाहेर काम करते.खरं तर, साल्वा हुसैनला आजपासून जवळपास ६ महिन्यापासून श्वास घेण्याची अडचण होत होती. सेल्वाची हि समस्या पुढे एवढी गंभीर होत गेली कि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व तपासामध्ये उघडकीस आले कि त्यांना सिरीयस हार्ट फेलियर ची अडचण होत आहे. साल्वा ची परिस्थिती एवढी नाजूक झाली होती कि त्यांच्यावर शस्त्रक्रिया हि केली जात नव्हती. अशामध्ये त्यांना जिवंत ठेवण्यासाठी ‘लाइफ सपोर्ट’ चा आधार घ्यावा लागला.ह्या गंभीर स्थितीत साल्वाला जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टर्स ने त्य्नाच्यासाठी एक असे कृत्रिम हृदय तयार केले जे शरीराच्या बाहेरील भागास असून देखील ते हृदयाप्रमाणे काम करते आणि रक्ताला संपूर्ण शरीरात प्रवाह करण्याचे काम करते. ह्या शस्त्रक्रियेनंतर साल्वा कृत्रिम हृदयाच्या साहाय्याने जिवंत आहे. अश्या परिस्थितीत साल्वा तिच्यासोबत नेहमी एक बॅग ठेवते, ज्यामध्ये तिचे हृदय आहे. २ मुलांची आई असलेली साल्वा हि असेच आपले जीवन जगत आहे. साल्वा सोबत नेहमी आणखीन एक बॅक-उप सिस्टिम असते आणि तिचे पती व एक सहायक असतात जेणेकरून जर ह्या सिस्टिममध्ये काही बिगाड झाला तर त्याला लगेच बदलू जाऊ शकेल. कुठल्याही गंभीर परिस्थितीमध्ये साल्वा चे हे कृत्रिम हृदय जवळपास ९० सेकंदामध्ये बदलणे आवश्यक आहे. सध्या साल्वा ह्या कृत्रिम हृदयाच्या साहाय्याने चांगले जीवन जगत आहे. साल्वा ला एक ५ वर्षांचा मुलगा आहे व १८ महिन्यांची एक मुलगी आहे. साल्वा हुसैन हि जगातील दुसरी अशी महिला आहे जि कृत्रिम हृदयाच्या साहाय्याने जिवंत आहे.
Exit mobile version