आता आता : या मोठ्या महिला नेत्याचे झाले निधन

मित्रानो या जगात ज्याने जन्म घेतला आहे त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचं आहे. कितीही पैसे असो किंवा कितीही चांगले शरीर असो एक दिवस त्याला हे जग सोडावं लागणार आहेच. अशीच एक मोठी दुःखाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परर्ष्ट्रमंत्री असणाऱ्या “सुषमा स्वराज” यांचं ६ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झालं. त्या किती वर्ष्यांच्या होत्या, कोणत्या कारणामुळे त्यांचं निधन झालं याविषयी आपण थोडक्यात पाहणार आहोत.

सुषमा स्वराज या ६७ वर्ष्यांच्या होत्या. हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना दिल्ली मधील एम्स या रुग्णालयात दाखल केलं गेलं होत. त्यांची तब्बेत बिघडल्यावर लगेच रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवत होती. मात्र त्या वाचू शकल्या नाहीत आणि त्यांचं निधन झालं. केंद्रीय स्वास्थ मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एम्स मध्ये हजर होते. त्यानंतर सुषमा स्वराज याना पाहण्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी एम्स रुग्णालयात गर्दी केली. सुषमा स्वराज यांचे पती आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य देखील तेथे होते.सुषमा स्वराज या मागील अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांची किडनी देखील बदली केली होती. त्यांच्या आजारपणामुळेच त्यांनी २०१९ मधील निवडणुकीत भाग घेतला नाही. मोदी सरकारच्या काळात त्या सुरवातीच्या परराष्ट्र मंत्री राहिल्या तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री देखील त्या होत्या. त्यांना दिल्लीमधील पहिल्या मुख्यमंत्री महिलेचा पुरस्कार देखील मिळाला होता. अश्या या सुषमा स्वराज यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *