वायरल फोटोमागचं सत्य काय आहे पहा, जम्मू काश्मीर मध्ये यामुळे तैनात आहे सैन्य

जम्मूकाश्मीर मध्ये राहत असलेले लोक सतत भीतीच्या वातावरणात राहत असतात. कारण त्यांच्यावर कधीही, कोणत्याही वेळी दहशतवादी हल्ला होऊ शकतो. भारतीय सैनिक आणि दहशतवादी यांच्यातील लढाईमध्ये होणाऱ्या चकमकीत तेथील रहिवासी देखील दहशतवाद्यांचे बळी पडू शकतात. सगळीकडे भीतीच वातावरण असून देखील भारतीय सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता भारतीय नागरिकांची रक्षा करतात. त्यामुळेच भारतीय नागरिक आपल्या सेनेचे नेहमी आभार मनात असतात. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो वायरल होत आहे. त्या वायरल फोटोमध्ये एक भारतीय सैनिक रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून बसला आहे आणि त्याच्या हातात बंदूक आहे. आज आपण याच फोटोमागील सत्य कहाणी पाहणार आहोत.

अनेक दिवसांपासून वायरल होणाऱ्या याफोटोमागे दारूसाठा सापडल्याने अमरनाथ यात्रा थांबवली असे कारण काही लोक सांगतात तर काही लोक या फोटोमागे एक कथा असल्याचे सांगतात. काहींनी तर हा फोटो शेअर करत लिहले कि, ‘काश्मीर मध्ये दगडफेक करणाऱ्याच्या मध्ये ज्याप्रकारे भारतीय सैनिक बसला आहे तशीच शिकवण आपण घेऊन येणाऱ्या परिस्थितीचा सामना केला पाहिजे.’ अनेकांनी आपापल्या मनाने काहीही लिहून फोटो वायरल केला. मात्र या मागे असलेली खरी गोष्ट काही वेगळीच आहे.
हा फोटो काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यातील रहिवाशी फैसल बशीर याने काढला होता. २ ऑगस्ट २०१९ ला हा फोटो त्याने काढला होता. फैसल बशीर अनंतनाग जिल्ह्यातील एका सरकारी डिग्री कॉलेज मध्ये शिक्षण घेतो. तो त्या कॉलेजमध्ये बी. ए मास कॉम करत आहे. हा फोटो त्याने त्यावेळी काढला जेव्हा काश्मीर मधील शोपीया मध्ये भारतीय सैनिक आणि आतंकवाद्यांमध्ये चकमक झाली होती. हा खूप वेळ चालणार एन्काउंटर होता आणि फैसल बशीर अनंतनाग वरून शोपीया ला आला होता.
फैसल म्हणाला दुपारी दिढ वाजायच्या सुमारास हा एन्काउंटर सुरु होता. बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज देखील येत होता आणि गोळ्या एन्काउंटर च्या दिशेने सुरु होत्या, नाकेबंदी केलेली होती. फैसल च्या म्हणण्यानुसार सैनिकाचा हा फोटो वायरल होत आहे तो सैनिक एन्काउंटर पासून थोडं लांब असणाऱ्या नाकेबंदी वरचा आहे. त्या सैनिकच काम नाकेबंदीवर भारत सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या लोकांना अडवण्याचे होते. स्पेशल ऑपरेशन चा एक सैनिक रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून बसला होता. त्याच्या हातात ऑटोमॅटिक बंदूक होती आणि तो लोकांना एन्काउंटर जवळ जाण्यासाठी आडवाटा होता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *