कधी या अभिनेत्र्याच्या साड्या इस्त्री करायचा निर्माता रोहित शेट्टी, असे पलटले नशीब

जर बॉलीवुड बद्दल बोलायचे झाले तर ह्यात काहीच शंका नाही कि, बॉलीवुडमध्ये आपले नाव करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. ह्यासाठी लोकांना खूप मेहनत करावी लागते, तेव्हा जाऊन तो सुपरस्टार बनतो. तर आज आम्ही बॉलीवुडमधधील एका अश्या सुपरस्टार विषयी बोलणार आहोत, ज्याने त्याच्या पूर्ण करियरच्या सुरुवातीपासून खूप मेहनत केली आहे. यात काहीच शंका नाही कि प्रत्येक सुपरस्टारच्या मागे कुठली नं कुठली संघर्षपूर्ण कहाणी दडलेली आहे. आणि कदाचित हेच कारण असावं कि भरपूर लोकं बॉलीवूडमध्ये आपले स्थान तयार करण्यासाठी स्वप्न पाहतात, पण त्यांना बोललीवूडमध्ये एन्ट्री भेटत नाही व दुसरीकडे काही लोकं टॅलेंटच्या बळावर बॉलीवूडमध्ये स्वतःचे एक वेगळेच स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतात.

अशीच एक कहाणी अलीकडील दिवसांत ऐकायला मिळाली, हो तर मंडळी आपण बोलत आहोत बॉलीवुडमधील सर्वात यशस्वी डाइरेक्टर रोहित शेट्टी ची. रोहितने त्याच्या खासगी जीवनाशी जुळलेल्या काही गोष्टी सर्वांसोबत शेयर केल्या. एक वेळ अशी होती कि रोहितने बॉलीवुड मधील अभिनेत्री तब्बू व काजोल यांच्यामागे स्पॉट बॉय म्हणून काम केले आहे. तर चला मंडळी आज आम्ही तुम्हाला रोहितच्या जीवनातील काही संघर्षाने भरलेल्या गोष्टींची माहिती सांगतो.तुमच्या माहितीसाठी सांगतो कि रोहित सध्या बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या डायरेक्टर्स मध्ये मोजल्या जातो, त्याने ‘गोलमाल’ सारख्या सुपरहिट चित्रपटांची सिरीज दर्शकांसाठी आणली होती आणि याव्यतिरिक्त त्याने ‘चेन्‍नई एक्‍सप्रैस’, ‘दिलवाले’, ‘सिंघम’ यांसारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट बनवले आहेत. आज एवढी मोठी उंची गाठणाऱ्या रोहित शेट्टी विषयी खूपच कमी लोक जाणतात कि त्याने स्पॉट बॉयचे देखील काम केले आहे. खरं तर ह्या गोष्टीचा खुलासा स्वतः रोहित शेट्टीने एका रिएलिटी शो ‘इंडियाज नेक्‍स्‍ट सुपरस्‍टार’ मध्ये केला आहे. रोहितने सांगितले कि १९९५ साली आलेला “हकीकत” चित्रपटामध्ये ते अजय देवगन और तब्बू चे स्पॉट बॉय म्हणून काम करत होते, एवढच नाही तर ते तब्बूच्या साड्या देखील इस्त्री करत होते.आज रोहितने त्याच्या मेहनतीने व जिद्दीने सर्वाना हैराण करून टाकले आहे आणि ज्या अभिनेत्यांच्याखाली त्यांनी काम केले होते, आज तेच सर्व अभिनेता-अभिनेत्री रोहित सोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. आणि अश्याच प्रवासाला यशस्वी प्रवास म्हणले जाते. रोहित शेट्टीने “जमीन” चित्रपटापासून त्याच्या करियर ची सुरुवात केली व हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. ह्या व्यतिरिक्त रोहित शेट्टीने मुलाखती दरम्यान सांगितले की, ते त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करतात. खरं तर रोहितचे असे म्हणणे आहे कि, जेव्हा तुम्ही चांगली उंची गाठता, तेव्हा तुम्ही अहंकार किव्हा गर्व न करता दुसऱ्यांचा आदर व सन्मान केला पाहिजेत. हीच एक गोष्ट एखाद्या व्यक्तीला चांगला व्यक्ती बनवण्यास मदत करते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *