Home / कलाकार / विवाह मधली छोटी आता झाली आहे मोठी, पाहून तुम्ही तिच्या प्रेमात पडाल

विवाह मधली छोटी आता झाली आहे मोठी, पाहून तुम्ही तिच्या प्रेमात पडाल

शाहिद व अमृता स्टार कास्ट असलेल्या ”विवाह” चित्रपटाला प्रदर्शित होऊन ११वर्षांहून अधिक काळ झाला आहे तरी देखील हा चित्रपट लोकांच्या हृदयात अजून आहे. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, हा चित्रपट त्या वेळेस खूप हिट गेला होता. हा एक फॅमिली इमोशनल आणि ड्रामा ने भरलेला चित्रपट त्या कालावधीतील सर्वात मोठ्या चित्रपटांमधून एक चित्रपट होता. चित्रपटात शाहिद व अमृता यांच्या व्यतिरिक्त आणखीन एक अभिनेत्री होती, जिने तिच्या अभिनयामुळे सर्वांच्या हृदयात एक घर बनवले होते.

हो! तर मंडळी आज आपण “विवाह” चित्रपटातील ज्या अभिनेत्रीबद्दल चर्चा करत आहोत, ती दुसरी कोणी नसून चित्रपटामधील “छोटी” ची भूमिका निभावणारी अमृता प्रकाश आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, अमृताच्या ह्या किरदाराला लोकांनी भर-भरून प्रेम दिले होते. चित्रपटामधील हि “छोटी” आता खूप मोठी झाली आहे व हॉट आणि सुंदर दिसत आहे. अमृताने ४ वर्षांची असताना एका लोकल फुटवियर कंपनीसाठी पहिल्यांदा जाहिरातीमध्ये काम केले. त्यानंतर तिने ‘डाबर’, ‘ग्लूकॉन-डी’, ‘रसना’, ‘सनसिल्क’ यांसारख्या बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केले. एवढच नाही तर ‘लाइफ ब्वॉय’ कंपनीसोबत तिने २ वर्षांचे कॉन्ट्रेक्ट पण केले होते.अमृताने नंतर २००१ साली ‘बाल-कलाकर’ म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली व त्या चित्रपटात तिने ‘मिनी’ नावाची भूमिका केली होती जी नंतर खूप प्रसिद्ध झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि अमृताच्या ह्या भूमिकेला लोकांनी इतके पसंद केले होते कि, तिला पुढे जाऊन ‘बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट’ म्हणून बरेच अवॉर्ड नॉमिनेशन सुद्धा मिळाले.जस-जशी अमृता तिच्या करियरकडे पुढे पाऊल टाकत गेली त्यानंतर तिला “विवाह” चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ह्या चित्रपटात काम केल्यानंतर अमृता प्रकाश खूपच प्रसिद्ध झाली होती. हा चित्रपट करून तिने अभिनयातून ब्रेक घेतला व पुढे ती तिचे शिक्षण पूर्ण करू लागली. अमृता प्रकाश नंतर मुंबईला येऊन राहू लागली आणि तिने मुंबई विद्यापीठातून ‘वाणिज्य आणि व्यवसाय प्रशासन’ मध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली. आज सोशल मीडियावर अमृता प्रकाश चे चाहते लाखोंच्या संख्येमध्ये आहेत व अमृता नेहमी तिच्या चाहत्यांसाठी स्वतःचे हॉट फोटोस शेयर करत असते, ज्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढू लागली व तिचे चाहते, तिचे फोटोस मोठ्या प्रमाणात पसंद करू लागले.

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.