मोबाईलचा सेन्सर मोठी मोठी कामे करू शकतो, तुम्ही देखील करू शकता हि ट्रिक

आपल्याकडे स्मार्टफोन तर असतोच पण त्याचा वापर काही लोक जास्त वेळ नाही करू शकत कारण काही लोकांकडे त्याला वापरण्यासाठी वेळ नसतो. तर काही लोकांकडे स्मार्टफोन असून सुद्धा त्याच्याकडे जास्त माहिती उपलब्ध नसते. आजच्या दिवसांत बहुतांश कामे मोबाईलच्या आधारानेच होतात म्हणून स्मार्टफोन बद्दल सर्वांना माहित असणे व त्याच्यामधील सॉफ्टवेअर्स ची माहिती सर्वांनाच असणे हे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला मोबाईलमधील सेन्सर बद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही फोनवर एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना बॅटरी वाचवण्याचे काम करते, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन लावता किव्हा फोन आल्यावर उचलता तेव्हा तुमच्या स्क्रीनची लाईट बंद होऊन जाते. पण काय तुम्हाला हे माहित आहे का, कि ह्या मोबाईलमधील सेन्सरच्या मदतीने तुम्ही अनेक गुप्त कामे करू शकता. ज्या विषयी तुम्हाला माहिती नसेल. ह्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी व डेटा वाचवू शकता.

हो तर मंडळी हि गोष्ट तुम्हाला माहिती नसेल. पण एक लहान अँप डाउनलोड करून तुम्ही भरपूर गोष्टी साध्य करू शकता. ह्यासाठी तुम्हाला २२Kb चा एक अँप डाउनलोड करावा लागेल. ज्याचे नाव Proximity Service असे आहे. ह्या अँपला फोनमध्ये इनस्टॉल केल्यानंतर तुम्ही ह्या सेन्सरच्या मदतीने अनेक कामे करू शकता.सर्वात प्रथम ‘गूगल प्ले’ मध्ये जाऊन अँप ला डाउनलोड करा. ह्या अँप ला लोकांनी ५ पैकी ४.५ एवढी पसंती दिली आहे म्हणजे भरपूर लोकांना हा अँप आवडला आहे व त्याचा वापर देखील फायदेशीर आहे. हा अँप ४ किव्हा त्याच्यावरील व्हर्सन मध्येच इनस्टॉल होऊ शकतो. सेन्सर असणाऱ्या फोन ला स्क्रिनच्या वरील भागात २ गोल बनलेले असतात, ह्याच ठिकाणी हे सेन्सर फिट केलेले असतात. अँपला ‘प्ले स्टोर’ मधून डाउनलोड केल्यानंतर, अँप उघडून त्याला ऍक्टिव्ह करा.प्ले स्टोर मधून डाउनलोड केल्यानंतर हा अँप आपले काम आपोआप सुरु करतो. जसं कि तुम्ही यू-ट्यूब वर गाणी पाहत असाल तर स्क्रीन सुरूच राहते, पण जर तुम्हाला यू-ट्यूब फक्त गाणी ऐकायची असतील तरी सुद्धा स्क्रीनची लाईट चालूच राहते व बॅटरी लो होऊ लागते त्याचबरोबर तुमचा इंटरनेट डेटा सुद्धा जास्त खर्ची होऊ लागतो. म्हणून ह्या अँपच्या साहाय्याने जर तुम्ही गाणी पाहत असताना सेन्सॉरवर हात ठेवला कि स्क्रीन बंद होऊन जाते व तुम्ही गाणे फक्त ऐकू देखील शकता ज्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी सुद्धा वाचू शकते व इंटरनेट डेटा देखील कमी खर्ची होण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या सेन्सरवर हात न ठेवता कागदाचा तुकडा देखील ठेवू शकता.ह्याच्या व्यतिरिक्त असे अनेक वेळा आढळले आहे कि तुम्ही फोनवर बोलून झाल्यानंतर मोबाईलची स्क्रीन बंद न करताच तुम्ही त्याला खिश्यामध्ये ठेऊन देता , त्यानंतर मोबाईलची स्क्रीन खिशामध्ये सुद्धा चालूच राहते. व कुठला हि अँप ओपन होऊ शकतो. काही वेळा तर चुकून कोणालाही विडिओ कॉल सुद्धा लागू शकतो, व ह्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. ह्यासोबत ह्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी सुद्धा उतरून जाते व डेटा कमी होऊ लागतो व हे तुम्हाला समजत देखील नाही. पण ह्या अँप मध्ये हि एक चांगली गोष्ट आहे कि, ह्याला डाउनलोड केल्यानंतर तुम्ही जसा मोबाइलला खिशामध्ये ठेवण्याचा प्रयत्न कराल तशी तुमची स्क्रीन लाइट बंद होऊन जाते. कारण ह्यामध्ये सेन्सरवर कुठलीही वस्तू आली किव्हा दोघांमध्ये कुठली वस्तू आली कि स्क्रीन आपोआप बंद होण्यास मदत होते, जेनेकडून तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर कमी होत नाही.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *