आलिया भट्ट चा भाऊ, पहा का असतो मीडियापासून लांब

आलीया भट्ट हि आजच्या काळातील तरुण मुलांची खूप चाहती झाली आहे. तिच्या सुंदर अभिनयामुळे व प्रेमळ स्वभावामुळे आलीयाने खुपच कमी वेळात लाखो लोकांचे मन जिंकले आहे. यासोबत आलिया भट्ट हि बॉलीवूडमधील त्या अभिनेत्रींनमध्ये मोजली जाते ज्यांनी अजून एकही चित्रपट फ्लॉप दिलेला नाही. जसे कि तुम्हा सर्वानाच माहित आहे कि, आलिया भट्ट ने तिच्या बॉलीवूड मधील करियरची सुरुवात २०१२ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ”स्टूडेंट ऑफ़ दी ईयर” पासून केली व ह्या चित्रपटात आलिया सोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत नजर आले. आलियाच्या ह्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच जोरदार कमाई केली. ह्या चित्रपटाच्या यशानंतर आलिया भट्ट ने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

जसे कि तुम्हाला सर्वानाच माहिती आहे कि, आलिया भट्टचे वडील हे महेश भट्ट आहेत आणि ते बॉलीवूडचमधील निर्माता, निर्देशक तसेच स्क्रिप्ट लेखक आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि महेश भट्ट यांनी बॉलीवुडमध्ये खूप मोठं-मोठ्या चित्रपटांचे निर्माण केले आहेत. महेश भट्ट यांनी २ वेळा लग्न केले आहे, त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव किरण भट्ट असे होते व त्या दोघांना २ मुलं होती, १ मुलगा म्हणजेच राहुल भट्ट आणि दुसरी मुलगी म्हणजे पूजा भट्ट. या नंतर त्यांनी दुसरे लग्न सोनी राजदान सोबत केले व त्यांनाही एकूण २ मुलं आहेत, ज्यांची नावे आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट अशी आहेत.पण आज आम्ही चर्चा करत आहोत, आलिया भट्टचे सख्खे भाऊ म्हणजेच राहुल भट्ट याची. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, राहुल हा आलियाचा मोठा भाऊ आहे व तो दिसायला खूपच हँडसम आहे आणि त्याची पर्सनालिटी बॉलीवूडमधील एखाद्या अभिनेत्यापेक्षा कमी नाहीये. राहुल भट्टला चित्रपटांमध्ये काम करायला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे ते बॉलीवूडपासून नेहमी दूरच असतात व कुठल्याही अभिनेत्याच्या कार्यक्रमात देखील सहभाग घेत नाही. राहुल भट्ट हा एक फिटनेस ट्रेनर आहे. राहुल भट्टची मुंबईमध्ये स्वतःची एक मोठी व्यायामशाळा देखील आहे, ज्याठिकाणी ते इतर लोकांना फिट व मजबूत राहण्याचे प्रशिक्षण देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *