अजय देवगांची संपत्ती पाहून थक्क व्हाल, एकदा पहाच

एक्शन हीरो अजय देवगन हे बॉलीवुड मधील एक मोठे अभिनेता म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म २ एप्रिल १९६९ रोजी झाला होता. अजय देवगन अभिनेता तर आहेच परंतु त्यासोबतच तो एक निर्देशक व निर्माता देखील आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, अजय देवगन ने १०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अजय ने एक्शन चित्रपटांपासून आपले करियर सुरु केले व नंतर हळू-हळू तो कॉमेडी चित्रपट देखील करू लागला व लोकांचे वेगळ्याच रूपाने मनोरंजन करू लागला.

अजय देवगनचा अनेक पुरस्कारांनी सन्मान देखील करण्यात आला आहे, अजयला २ राष्ट्रीय तर ४ फिल्मफेयर पुरस्कार भेटले आहेत आणि या व्यतिरिक्त अनेक लहान पुरस्कारांनी त्याचा गौरव करण्यात आला. अजय देवगनला ‘बॉलीवूडचा सिंघम’ या नावाने ओळखले जाते. जर त्याच्या संपत्तीविषयी बोलायचं झालं, तर तुम्ही अंदाज देखील लावू शकणार नाही कि त्याची संपत्ती किती करोडांमध्ये आहे.तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, अजय देवगनची एकूण संपत्ती ३२ मिलियन डॉलर एवढी आहे. अजयची एवढी कमाई चित्रपटांमध्ये, जाहिरातींमध्ये काम करून व खाजगी गुंतवणूकीद्वारे येते. जर अजयच्या मागील ५ वर्षांच्या कमाईबद्दल सांगायचे झाले, तर त्याची कमाई हि ५ वर्षांत ६०% हुन अधिक वाढली आहे.अजय देवगनच्या एकूण संपत्ती मध्ये त्याचे घर देखील मोजले जाते. अजयने त्याच्या घराला “शिव शक्ति” असे नाव ठेवले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अजय देवगन भगवान शंकराचे मोठे भक्त आहेत व त्यांना खूप पूजतात. अजयचे हे आलिशान घर म्हणजे बंगला मुंबईमध्ये आहे. अजय देवगनच्या बंगल्याची किंमत हि जवळपास २ करोड़ डॉलर हुन अधिक आहे. या व्यतिरिक्त त्याचे २ मोठे अपार्टमेंट्स देखील आहेत व ते सुद्धा मुंबईमध्येच आहेत. अजय हा बॉलीवुडमधील असा अभिनेता आहे, ज्याचा स्वतःचा एक खाजगी जेट आहे.अजयने जेट विमान २०१० साली विकत घेतला होता. ह्या जेटमध्ये एकूण ६ सीट्स आहेत व अजय ह्या जेटचा वापर त्याच्या खाजगी कामांसाठीच करतो. अजय देवगनला रॉयल कारचा देखील शॉक आहे व त्याच्याकडे मार्केटमधील लेटेस्ट कारचे कलेक्शन देखील आहे. त्याच्या कलेक्शन मध्ये टोयोटा, BMW-झेड ४ व ऑडी सारख्या लक्जरी कार्स सुद्धा आहेत. मागील काही दिवसांअगोदर अजय देवगनने मॅसरटी क्वाट्र्रोपोर्ट कार सुद्धा घेतली आहे, ज्याची किंमत जवळपास २ करोड एवढी आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *