हे आहे भारतातील सर्वात उंच उंचीच कुटुंब, महाराष्ट्रात कुठे राहतात पहा

उंचीने लांब असलेल्या लोकांना नेहमी डिसेंट व्यक्तिमत्व असेलेले व्यक्ती समजले जाते. प्रत्येकाला चांगली उंची हवी असते परंतु सर्वांना चांगली उंची मिळत नाही कारण हे पूर्णपणे शरीरातील हॉर्मोन व जीन्स वर अवलंबून असते. आज आम्ही तुम्हला भारतामधील एका अश्या परिवार विषयी सांगणार आहोत ज्यामध्ये पती-पत्नी व त्यांच्या मुलांची उंची नॉर्मल हुन जास्त आहे. ह्या परिवारामधील सर्वांची उंची जवळपास 26 फूट आहे. तर चला मंडळी आज आम्ही तुम्हाला या परिवार बद्दल सर्व माहिती सांगतो व त्यांना जास्त उंची असल्याने कोणत्या समस्या सहन कराव्या लागत आहेत.

लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये शामिल आहे या परिवाराचे नाव : तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, पुण्यामध्ये राहत असणाऱ्या ह्या परिवार मधील सदस्यांची उंची नॉर्मल लोकांच्या लांब उंची एवढी नसून ह्या परिवारामधील पती-पत्नीच्या जोडीला अनेक प्रकारचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. ह्या पती-पत्नीची उंची प्रत्येकाला त्यांच्यावर आकर्षित करते, एवढच नाही तर या परिवारामधील मुले देखील लांब उंचीबाबत खूप नशीबवान आहेत आणि कुठल्याही नॉर्मल मुलांपेक्षा ह्या मुलांची उंची खूप जास्त आहे. त्यांच्या लांब उंचीमुळेच ह्या परिवाराचे नाव लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लिहिले गेले आहे. पुण्यामध्ये राहणाऱ्या या परिवाराला त्यांच्या लांब उंचीमुळे अनेक फायदे होत असले तरी ह्याच उंचीमुळे त्यांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना देखील करावा लागत आहे. या मागील मुख्य कारण हे आहे कि, आपल्या देशातील नॉर्मल व्यक्तींची उंची जास्तीत-जास्त ६ फूट एवढीच मानली जाते व ह्याच्या हिशोबानेच प्रत्येक वस्तूला बनवले जाते. पण ह्या परिवारामधील सर्व सदस्यांना त्यांच्या उंचीनुसार सर्व गोष्टींना समायोजित करणे खूप अवघड जाते आणि म्हणूनच बऱ्याच वेळा त्यांना अडचणींचा देखील सामना करावा लागतो.पत्नीची उंची चांगली असल्यामुळे केले होते लग्न : आपण ज्या परिवाराबद्दल बोलत आहोत ते पुण्यातील पिंपरीमधील राहणारे कुलकर्णी परिवार आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, ह्या परिवारामध्ये एकूण ४ सदस्य आहेत, ५६ वर्षीय शरद कुलकर्णी, त्यांची पत्नी संजोत व २ मुली. तुम्हाला हे ऐकून हैराणी होईल कि, शरद कुलकर्णी ची उंची ७ फूट २ इंच एवढी असून त्यांच्या पत्नी संजोत यांची उंची ६ फूट २ इंच आहे आणि त्यांच्या दोन्ही मुलींची उंची हि ६ फूट हुन अधिक आहे. जर या चौघांच्या उंचीची टोटल केली तर ती २६ फूट हून अधिक होते जी लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी खूप आहे. शरद व संजोतची मोठी मुलगी मुरुगा हि २६ वर्षांची आहे आणि तिची उंची जवळपास ६ फूट आहे, याव्यतिरिक्त त्यांची छोटी मुलगी सानिया २० वर्षांची आहे पण तिंची उंची तिच्या आई व मोठ्या बहिणीहून सुद्धा मोठी आहे. ह्या परिवारासोबत बोलणे झाले तेव्हा परिवारामधील मुख्य सदस्य शरदने सांगितले कि त्यांची उंची खूपच अधिक असल्या कारणाने त्यांना लग्नासाठी कुठली मुलगी मिळत नव्हती पण जेव्हा संजोत ची मागणी त्यांच्याकडे आली तेव्हा तिची उंची पाहून शरद यांनी लग्नासाठी लगेच होकार दिला व अश्या प्रकारे शरद आणि संजोत चे लग्न झाले. लग्नाला घेऊन ज्याप्रकरच्या अडचणी शरदला येत होत्या, तश्याच अडचणी संजोत ला देखील येत होत्या परंतु देवाने या दोघांना मिळवले व आज हे दोघेही त्यांच्या परिवाराचे मुख्य सदस्य आहेत.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *