या अभिनेत्यावर सोनाली करायची वेड्यासारखं प्रेम, लग्न झालेलं असल्यामुळे नाही करू शकली

बॉलीवुडमधील जुन्या काळातील सुंदर अभिनेत्रींमध्ये एक नाव सोनाली बेंद्रेचे देखील घेतले जातील. सोनाली बेंद्रे जेवढी सुंदर अभिनेत्री आहे तेवढेच सुंदर तिचे व्यक्तिमत्व देखील आहे. हिंदी फिल्म जगातील एका अभिनेता-अभिनेत्री मधील अफेयरच्या बातम्या तर खूप सामान्य आहेत. सोनाली बेंद्रे हि एक अशी अभिनेत्री आहे, जिला प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्यासोबत तर प्रेम झाले होते परंतु तिने ह्या गोष्टीबाबत कधीच त्याला सांगितले नाही. तर चला मंडळी आज आम्ही तुम्हाला सांगतो कि, नेमका हा प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता कोण आहे, ज्याच्या प्रेमात सोनाली बेंद्रे अडकली होती तरी देखील त्याला सांगितले नाही.

ह्या बॉलीवूड अभिनेत्यावर प्रेम होते सोनालीला : ज्याच्यावर सोनाली बेंद्रे प्रेम करत होती तो दुसरा कोणी नसून बॉलीवूड मधील प्रसिद्ध ऍक्शन हिरो सुनील शेट्टी होता. सुनील शेट्टी व सोनाली बेंद्रे ची जोडी ९० च्या दशकात खूपच सुप्रसिद्ध ठरली होती आणि या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये पण केले होते, जसं कि ‘बलवान’ , ‘गोपी किशन’ आणि ‘भाई’. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि सुनील शेट्टी हा एक असा अभिनेता होता, ज्याबद्द्ल आजपर्यंत एकही अभिनेत्री सोबत अफेयर असल्याची बातमी आली नाही. म्हणूनच सोनाली बेंद्रेला जेव्हा सुनील शेट्टीवर प्रेम झाले तेव्हा तिने कधीही या बद्दल खुलासा केला नाही व यामागील अजून एक कारण असे होते कि सुनील शेट्टी हे आधीपासूनच विवाहित होते. आज सुनील शेट्टी भले हि चित्रपटांमध्ये जास्त दिसत नसले, तरी देखील आज तो त्याच्या व्यवसायात खूप यशस्वी आहे आणि यानेच त्यांचे पूर्ण परिवार जगत आहे. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने तिच्या फिल्म करियरची सुरुवात सूरज पंचोली सोबत “हिरो” ह्या चित्रपटापासून केला होता, परंतु ह्या चित्रपट जास्त काळ चालला नाही व या नंतर देखील आथिया अजून एकाही चित्रपटात काम मिळालेले नाही.चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सोनालीला झाले होते सुनील सोबत प्रेम : सूत्रांनुसार असे समोर आले आहे कि सोनाली बेंद्रे हि मनातल्या-मनातच सुनील शेट्टीला खूप आवडत होती पण तिने हि गोष्ट कधीही सुनीलला सांगितली नाही कारण, सुनील शेट्टीहे आधीपासूनच माना वर प्रेम करत होते व त्याचे लग्न झाले होते. सोनालीला अगदी जवळून ओळखणाऱ्या लोकांचे असे म्हणणे आहे कि, शूटिंगच्या दरम्यान सुनील व सोनाली खूप वेळ एक-मेकांसोबत घालवत होते आणि आपापल्या गोष्टी शेयर करत होते. ह्याच दरम्यान सोनाली सुनील शेट्टीला खूप जवळून ओळखू लागली होती व तिला सुनील शेट्टीसोबत प्रेम झाले. गोविंदा ने एका मुलाखतीमध्ये सांगितले होती कि, सुनील जर विवाहित नसते तर त्याने एक वेळेस सोनालीचा विचार केला असता. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि गोविंदा व सुनील शेट्टी हे दोघे एक-मेकांचे खूप चांगले मित्र होते व आज देखील ते एक-मेकांना मदत करण्यासाठी लगेच धावून येतात. आज भले हि सोनाली आणि सुनील सोबत नसले तरी देखील ते दोघे हि त्यांच्या जीवनात खूप सुखी आहेत. सोनाली बेंद्रेने नंतर चित्रपट निर्माता ‘गोल्डी बहल’ सोबत विवाह केला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *