कार, बाईक किंवा स्कुटीवर आलेले स्क्रॅच ५ रुपयांमध्ये घरबसल्या घालवा

आजकाल कार, बाईक किव्हा स्कुटीवर स्क्रॅच येणे खूपच सामान्य समस्या झाली आहे आणि या समस्याला दूर करण्यासाठी लोकांचे खूप पैसे खर्च होतात. काही वेळा तुमच्या चुकीमुळे किव्हा काही वेळा दुसऱ्यांच्या चुकीमुळे तुमच्या गाडीवर स्क्रॅच पडतात. मात्र ह्याची भरपाई तुम्हालाच करावी लागते, तरीसुद्धा ते स्क्रॅच पूर्णपणे लपत नाहीत व तुमच्या गाडीची सुंदरता कमी दिसू लागते. यासाठीच तुम्हाला तुमच्या गाडीवरील स्क्रॅच काढण्यासाठी कमी खर्चिय पद्धत माहिती असणे फार गरजेचे आहे. म्हणून तुमच्या ह्या समस्येला लक्ष्यात घेऊन आज आम्ही तुम्हाला अश्या टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही घरी बसून सुद्धा कमी खर्चात हे स्क्रॅच घालवू शकता.

पैशाची किंमत हि गाडीवरील स्क्रॅचवर देखील आधारित असते. तुम्हाला हे ऐकून हैराणी होईल कि, कार किव्हा बाईकवरील स्क्रॅच घालवण्याचा याहून साधा-सोपा उपाय तुम्हाला मिळणारच नाही. तसं हि तुम्ही जेव्हा गाडीच्या शोरूम मध्ये जाऊन स्क्रॅच दुरुस्त करता तेव्हा तिकडे तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतात. याव्यतिरिक्त तुम्हाला हि गोष्ट देखील समजून घेणे आवश्यक आहे कि तुमच्या गाडीवर वास्तवमध्ये स्क्रॅच आली आहे कि फक्त डेन्ट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, जेव्हा एखाद्या गाडीवर डेन्ट येतो, तेव्हा त्या जागी गाडीचा कलर निघून जातो व ह्या प्रकारे तुम्ही डेन्ट आणि स्क्रॅच यामधील फरक ओळखू शकता.अनेकवेळा स्क्रॅच हि गाडीच्या कलरवरच पडते आणि त्याला तुम्ही अगदी आरामात घालवू शकता. आज आम्ही तुम्हाला जी टिप्स सांगणार आहोत त्याने स्क्रॅच जाईल किव्हा नाही, हे तुमच्या गाडीवरील स्क्रॅचवर देखील निर्भर करते. परंतु आम्ही तुम्हाला एवढी खात्री तरी देऊ शकतो कि या ट्रिकमुळे तुमच्या गाडीवरील स्क्रॅच पहिल्यापेक्षा कमी होईल. तर चला आता आम्ही तुम्हाला या चमत्कारी ट्रिकबद्दल विस्तारमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. गाडी किव्हा कुठल्याही प्रकारच्या वाहनावरील स्क्रॅच घालवण्यासाठी तुम्हाला कोलगेट किव्हा या सारखीच कुठल्याही टूथपेस्टची गरज आहे. खरं तर कोलगेट मध्ये कॅल्शियम कार्बोनेट असते, जे डाग किव्हा घाण साफ करण्यास मदत करते.कोलगेटला किव्हा टूथपेस्टला तुम्ही गाडीवरील स्क्रॅच आलेल्या भागात लावून घ्या. या नंतर हळू-हळू त्याला बोटांनी रगडवा आणि सलग ३-४ मिनिटे रगडल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे एका चांगल्या कपड्याने साफ करा. हे केल्याने तुमच्या गाडीवरील किव्हा कुठल्याही इतर वाहनावरील स्क्रॅच निघून जाईल, जर स्क्रॅच पूर्णपणे गेली नाही तर ती कमी तरी नक्कीच होईल कारण, काही स्क्रॅच हे खूप खोल असल्यामुळे त्या लवकर भरत नाहीत. जर हीच क्रिया २-३ वेळेस केली तर स्क्रॅच अजून कमी होण्यास मदत होऊ शकते व तुमचे पैसे देखील वाचण्यास मदत होते. म्हणून जे लोकं पैशांचा जास्त विचार करतात, त्यांच्यासाठी हा सरळ-सोपा घरघुती उपाय अगदी कमी खर्चात होतो.तर मंडळी हि सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगून तर टाकली पण ह्या ट्रेकचा वापर करणे किंवा न करणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. ज्याच्याकड कमी पैसे असतील कदाचित ती लोक ह्या सोप्या टिप्सचा वापर करतील किव्हा एखादा व्यक्ती ह्याचा परिणाम बघन्यासाठी एकदा तरी वापर करेल. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हि टीप आवडली असेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *