देश कोणतेही असो, प्रत्येक देशात लग्नाचे महत्व एक सारखेच असते. भारतात लग्नाला सांस्कृतिक रूपात साजरे केले जाते. ह्यामुळे इथे लग्नाचे महत्व थोडे जास्त वाढले जाते. लग्न दोन लोकांमध्ये मॅकमेकांच्या संमतीनेच होते. आता तो जमाना गेला जेव्हा एकमेकांच्या मर्जीशिवाय लग्न व्हायची. आजच्या युगात लग्नासाठी दोघांची संमती असणे खूप गरजेचे आहे. असं नसलं कि नातं जास्त काळ टिकत नाही.
आज सुद्धा आपल्या देशात सर्वात जास्त अरेंज मॅरेजच होतात. अरेंज मॅरेज मध्ये बहुतेकदा घरातल्यांच्या आवडीच्या मुली किंवा मुलासोबत लग्न होते. अशामध्ये दोघांनी एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेणे हे दोघांसाठी खूप जरुरीचे असते. ह्यामुळेच साखरपुडा आणि लग्न ह्यामध्ये काही दिवसांचे अंतर ठेवलं जाते. कारण ह्यादरम्यान दोघेही एकमेकांबद्दल चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतात. ह्यादरम्यान दोघेही पार्टनर एकदुसर्यांसोबत भेटतात किंवा फोन वर गप्पा मारून एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

लग्नाअगोदर तुमच्या पार्टनरला ह्या गोष्टी सांगणे टाळा –
तुमच्या भूतकाळाबद्दल : प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा एक भूतकाळ असतो. हा चांगला सुद्धा असतो आणि वाईट सुद्धा असतो. भूतकाळात काही अश्या घटना घडतात ज्या रहस्यच राहिलेल्याच जास्त चांगल्या असतात. ह्यामुळे मुलगा असो वा मुलगी लग्नाअगोदर तुमच्या पार्टनर सोबत तुमच्या भूतकाळाबद्दल न बोललेलंच जास्त चांगलं असते.
कुटुंबाबद्दल गोष्टी : प्रत्येक कुटुंबाचे आपले स्वतःचे काही रहस्य असतात. तसे तर भारतात लग्नाअगोदर दोन्ही कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यानंतर केली जाते. चांगल्या प्रकारे जाणल्यानंतरच लग्नाची वार्ता पुढे वाढवली जाते. तरीसुद्दा तुमच्या कुटुंबाविषयी काही गोष्टी अश्या असतात ज्या कोणालाच माहिती पडायला नकोत. खासकरून तर जेव्हा तुमचे लग्न होणार असते तेव्हा.

चुकूनही तुमची कमजोरी सांगू नका : प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमजोरी हि असतेच. खरंच सांगितले आहे कि ह्या दुनियेत कुणीच परफेक्ट नाही आहे. काही अश्या कमजोरी सुद्धा असतात ज्याबद्दल कुणासोबत सुद्दा नाही इतकंच काय तर तुमच्या पार्टनरसोबत सुद्धा शेअर करणे टाळावे. हे सुद्धा होऊ शकते कि तुमच्या त्या कमजोरीमुळे तुमचा पार्टनर लग्नाला नकार देऊ शकतो.