aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

जर तुमचे जीवन खराब चालू असेल तर स्वतःला कसे सांभाळाल : ह्या गोष्टीपासून प्रेरणा घ्या

पुन्हा एकदा सोनियाच्या कानात कोणाचा तरी आवाज आला कि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. सोनियाने पाठीमागे वळून पाहिले तर अनिल तिथे होता. सोनियाने सांगितले कि शेवटी तू माझा पाठलाग करणं का थांबवत नाही? का मला सतावतो आहेस? मी तुझ्यावर प्रेम करत नाही आणि तू त्या लायकीचा सुद्धा नाही कि कोणी तुमच्यावर प्रेम करेल. चल निघून जा इथून आणि मला एकटं राहू दे. तुझ्यामुळे माझे आयुष्य खराब झाले आहे. अनिलने पुन्हा एकदा सांगितले, “माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला खूप सुखात ठेवेल.” सोनियाला राग आला. तिने अनिलला कानाखाली लगावली आणि ती तिथून निघून घेली. परंतु अनिलने अचानक सोनियाचा हाथ पकडला आणि तिच्या समोरच ब्लेडने स्वतःचा हाथ कापून घेतला. सोनिया घाबरली ती वर्गाच्या बाहेर निघून गेली.

संपूर्ण वर्गाने अनिलचा हा तमाशा पाहिला. ह्यानंतर दोन दिवस सोनिया कॉलेज मध्ये आली नाही. दोन दिवसानंतर सोनिया कॉलेज मध्ये आली. अनिल तिचीच वाट पाहत उभा होता. अनिलने पुन्हा तिच्या जवळ येऊन आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला परंतु सोनियाने पुन्हा पाहिल्यासारखे त्याला साफ इन्कार केले. इन्कार करतेवेळी सोनिया घाबरत होती. सोनियाचा आता अनिलच्या चेहऱ्यापासूनसुद्धा भीती वाटत होती. कारण एक वेडा मागे लागला होता. ती सारखं सारखं त्याला टाळत असायची आणि तो सारखं सारखं हाथ कापून घेत असे. सोनीयाचे जीवन नरकासमान झाले होते. तिला प्रत्येकवेळी अनिलचाच चेहरा समोर दिसायचा. तिच्या डोळ्यासमोर फक्त अनिलचाच चेहरा फिरत राहायचा. आता सोनिया कॉलेजला जाण्याससुद्धा घाबरत होती. जेव्हा पण ती कॉलेजमध्ये जायची अनिल तिचा रस्त्यात वाट पाहत उभा असायचा. मग एके दिवशी संपूर्ण वर्गातील मुलांनी सोनियाला समजावले कि त्याचे खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांच्याइतके प्रेम तुला जगात कुणीच करू शकत नाही. एकदा त्याच्या सोबत नाते जोडून तर बघ. सोनियाला त्यांचे म्हणणे मान्य करायला लावले. सोनियाने सुद्धा मग अनिलचे प्रेम स्वीकारले. मग दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली. सोनियाचा अनिल आवडू लागला. अनिल सोनियाची व्यवस्थित काळजी घ्यायचा. त्याच्या प्रेम खूप वाढले होते.
एके दिवशी सोनियाच्या शेजारी व्यक्तीने दोघांना एकत्र पहिले आणि तिच्या घरी जाऊन घरच्यांना सांगितले. सोनियाला वडिलांनी खूप मारले. अनिलला सुद्धा सोनियाच्या वडिलांनी घरी जाऊन मारले. परंतु नंतर त्यावेळी अनिलने अशी गोष्ट बोलली कि ज्यामुळे अनिलचा मार वाचला. अनिलने सांगितले कि मला मारून काही फायदा नाही, तुमची मुलगीच माझ्या मागे लागलेली होती.
जेव्हा हि गोष्ट सोनियाचा माहिती पडली तेव्हा ती शॉकच झाली. तिला समजत नव्हते कि शेवटी अनिल असं कसं बोलू शकतो. तिला वडिलांच्या मारण्याने इतके दुःख झाले नाही जितके अनिलच्या त्या गोष्टीने झाले. सोनिया आता मनातून तुटली होती. सोनियाच्या मोठ्या बहिणीने तिची काळजी घेतली आणि तिचे मन दुसऱ्या गोष्टीत गुंतवण्याचा प्रयत्न केला. परंतु सोनिया ह्या दुःखातून बाहेरच येत नव्हती. सोनियाच्या वडिलांनी तिला अनिलला विसरण्यासाठी एका महिन्याचा अवधी दिला आणि सांगितले त्यानंतर तिचे लग्न दुसऱ्या कुणासोबत करून दिले जाणार.सोनियाची बहीण तासनतास सोनियाला समजवायची. सोनियाच्या बहिणीने जसे वडील सांगत आहेत तसे करण्याचा सल्ला दिला. शेवटी सोनियाला सुद्धा वडिलांची आणि बहिणीची गोष्ट पटली. तिने विचार केला कि ज्या व्यक्तीला तिच्याशी काहीच मतलब नाही आहे अश्या व्यक्तीसाठी आपण आपले जीवन खराब करत आहोत. सोनिया लग्नासाठी तयार झाली आणि तिचे लग्न सुद्धा झाले. परंतु ती आज सुद्धा तिच्यासोबत झालेला विश्वासघात विसरली नव्हती.
ती एकदा अनिलशी भेटून त्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. तिला विचारायचे होते कि शेवटी का त्याने कॉलेज मध्ये तिचे जीवन उध्वस्त केले होते. परंतु सोनियाची अनिल सोबत भेट कधीच झाली नाही. आणि सोनिया काही न सापडलेल्या प्रश्नासोबतच आपले जीवन सुखाने जगत होती.
ह्या कहाणीच्या माध्यमातून आम्ही फक्त हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत कि जेव्हा कोणा व्यक्तीला आपल्या नाही असल्याने काहीच फरक पडत नाही तेव्हा त्याव्यक्तीला विसरणे जास्त चांगले असते. असं केलं नाही तर ती व्यक्ती तुम्हांला सर्व काही विसरण्यास मजबूर करणार. तुमचे जीवन आयुष्यभरासाठी उध्वस्त होऊन जाईल. हयामुळे जे घडून गेले आहे त्याला विसरनेच जास्त योग्य आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *