घरची गरिबी मात्र जिद्दीने हा मुलगा झाला इस्रो मध्ये तंत्रज्ञ

आपल्या भारतात गरिबांची संख्या जास्त असली तरी त्यांच्या मुलांमध्ये शिकण्याची जिद्द असते. अनेक गरिबांची मूळ पुढे इतके नाव कमावतात कि त्यांचा आदर्श संपूर्ण जग घेत. साध्याच चर्चेत असणारी हिमा दास हिने देखील २० दिवसांमध्ये ६ सुवर्णपदक भारताला मिळवून दिले आहेत. अश्याच अनेक गरीब घरातल्या मुलांनी आपले आणि कुटुंबाचे नाव मोठे केले आहे. सध्या पालघरमधील एका मुलाने देखील आले नाव मोटेह केले आहे.

पालघरमधील मायखोप येथील मुलगा वंदेश राजेश पाटील याने आपल्या आईवडिलांच्या कष्टाचे फळ मिळवले आहे. २०१७ मध्ये वंदेश ला संधी मिळाली नव्हती मात्र आता त्याला चांद्रयान २ या उपग्रहांदरम्यान इसरो मधील प्रशिक्षणार्थी म्हणून ईमेल आला. मेल आल्यावर तो आणि त्याचे कुटुंब देखील खूप खुश झाले. वंदेश च्या वडिलांचे दहा वर्षयांपूर्वी निधन झाले होते नंतर आईनेच मुलांची जवाबदारी सांभाळली.
वंदेश आपल्या आई आंही दोन भावांसोबत राहतो तसेच वंदेश ची आई मासे आणि भाजीपाला देखील विकते. आईचे कष्ट वंदेश ला जाणवत होते त्याला आईच्या मेहनतीचे चीज करायचे होते म्हणून प्रयत्न केले. इन्फरमेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स यामध्ये वंदेशने आयटीआय केला. प्रतिथयश टेक्निकल कॉलेज मध्ये लॅब असिस्टंट ची नोकरी करत वंदेश शिकत राहिला.वंदेश ने आपले शिक्षण पुढे डिप्लोमा इन काम्पुटर इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण केले. नासा सारख्या भारताच्या मोठ्या इसरो कंपनीत तो रुजू झाल्याने भारताची प्रगती नक्कीच करेल अशी आशा आहे. इसरो ने अनेक उपग्रह अवकाशात सोडले आहेत तसेच कमी खर्चात जास्त माहिती मिळणार इसरो हे एकमेव आहे असे म्हणायला हरकत नाही. “इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन” हा इसरो चा फुल्ल फॉर्म आहे. वंदेश ला इसरो मध्ये नोकरी मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *