NMJOKE

हे तीन प्रश्न तुम्हाला सांगतील कि, तुमचा होणार जोडीदार तुमच्यासाठी योग्य आहे कि नाही ते

लग्न-विवाह प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा निर्णय असतो. जवळजवळ प्रत्येकालाच लग्न करावे लागते. आणि लग्नानंतर काही अनुचित घडू नये किंवा कोणत्या चुका होऊ नये म्हणून आपल्याला नातं बनवण्याअगोदर जोडीदाराला पारखून घ्यावे लागते. आम्ही तुम्हाला खूप सोपे प्रश्न विचारणार ज्याने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही किती कॉम्पॅटिबल आहेत ते पडताळू शकता.

. तुम्हांला राग केव्हा येतो? : तसं पाहिलं तर ऐकायला हा प्रश्न एकदम सोपा वाटत असेल परंतु ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अनेक रहस्य दडले आहेत. आतमधील भांडणं तर एका घरात राहणाऱ्या आईवडील आणि भाऊ बहिणीत सुद्धा होत असतात. परंतु तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्याल तर तुम्हाला निर्णय घेण्यास जास्त कठीण जाणार नाही कि तुमचा पार्टनर शॉर्ट टेम्पर्ड तर नाही ना. किंवा तो छोट्या छोट्या गोष्टीवर चिडत तर नाही ना. सोबत हा प्रश्न सुद्धा विचारा कि जर दोघांना एकाच वेळी राग आला तर तुमचा पार्टनर काय करेल.? ह्यामुळे तुम्हांला पुढच्या नात्यासाठी निर्णय घेणे सोपे जाईल.२. पास्ट रिलेशनशिप : तुमच्या पार्टनर चे भूतकाळ जाणणं खूप गरजेचे आहे. ह्यामुळे आपण एकमेकांवर असलेल्या विश्वासाला वाढवू शकतो. हि गोष्ट जाणून घ्या कि भूतकाळात तुमच्या जोडीदाराचे कोणाशी रिलेशन होते कि नाही. जर उत्तर हो असेल तर ब्रेकअपचे कारण सुद्धा जाणून घ्या. असं असू शकते कि त्याचे कारण तुमचे सुद्धा नातं बिघडवू शकते. ह्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरचा स्वभाव चांगल्या प्रकारे समजू शकता.३. करिअर आणि भविष्याच्या दृष्टीने विचार : ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून तुम्ही तुमचे आणि तुमच्या मुलांचे भविष्य जणू शकता. जर तुमचा पार्टनर त्याच्या कामाविषयी संवेदनशील आहे आणि जीवनात खूप काही करू इच्छित असेल आणि सोबतच नात्यांना सुद्धा प्राधान्य देत असेल तर समजून जा कि तुमच्यासाठी नातं योग्य आहे. आशा करत आहोत कि हे तिन्ही उत्तर तुमच्या लक्षात असावे.
Exit mobile version