‘त्या’ कारणामुळेच आजकालच्या मुलींना सिंगल राहावेसे वाटते : बघा कोणते आहे ते कारण

हिंदीमध्ये प्रेमाबद्दल एक म्हण आहे ‘यह प्यार नहीं आसान, बस इतना समझ लीजिए एक आग का दरिया है और डूब के जाना है’ . तर मित्रांनो काहीसं असच होत असतं, प्रेमाचं हे चक्र जिथे जास्त काळ टिकवणं सोपं नसतं. एका नात्यात अनेकदा अशी वेळ येते कि जेव्हा एका पार्टनरचा दुसऱ्या पार्टनरवरचा विश्वास उडून जातो. तेव्हा असं वाटू लागते कि यार आपण सिंगल असतो तर खूप बरे झाले असते. चला तर जाणून घेऊया अशीच काही कारणे ज्यामुळे आजच्या काळात मुली सिंगल राहणंच जास्त योग्य समजतात.

१. बॉयफ्रेंडचे प्रत्येक गोष्टीत अडवणं : प्रत्येक गोष्टीत कोणीतरी अडवणं हे कोणत्याच मुलीला आवडत नाही. आणि आपल्या पार्टनर ने तिच्या कोणत्या मित्रांसोबत जास्त वेळ गप्पागोष्टी करणे हे कोणत्याही मुलाला आवडत नाही. त्यामुळे बॉयफ्रेंड नेहमी आपल्या पार्टनरला इतर मुलांपासून जास्त बोलण्यासाठी नेहमी अडवत असतो. बॉयफ्रेंडचे सर्वच स्वभाव मुलींना पसंद पडतात असे नाही. मुलींचं सिंगल राहण्यामागचं हे सुद्धा एक कारण असतं.२. मन नसतानाही फिरायला जाणं : खूप वेळा असं होतं कि त्यांचं मन घरीच राहायचं होत असतं परंतु बॉयफ्रेंडच्या फोर्स करण्यामुळे नाईलाजाने त्यांना बॉयफ्रेंडसोबत फिरायला जावं लागतं. हि गोष्ट सुद्धा मुलींना खूपवेळा आवडत नाही.३. आपल्या आवडीचे कपडे न घालणे : प्रत्येक मुलीची इच्छा असते कि ती सर्वात वेगळी आणि खास दिसेल त्यासाठी तिला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालण्याची इच्छा असते. परंतु पार्टनरला ते पसंद नसते. ज्याकारणामुळे तिला तिच्या ह्या इच्छेवर आवर घालावा लागतो. सिंगल असलेल्या मुलींना मनासारखे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करता येतात.
४. पैश्यांची समस्या : खूप वेळा असं होतं कि बॉयफ्रेंड त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पैसे खर्च करण्यासाठी सुद्धा रोखतात. हि गोष्ट सुद्धा मुलींना आवडत नाही. त्यांचे मानणे असते कि जर त्या स्वतः कमावू शकतात तर त्या खर्च का करू शकत नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *