गरीब वडिलांकडे मुलाचे दप्तर घ्यायला नव्हते पैसे, पण मुलासाठी वडिलांनी काय केले पहा

शिक्षण हि काळाची गरज आहे हि महान तर तुम्ही ऐकली असेलच. आज शिक्षणामध्ये इतकी स्पर्धा वाढली आहे कि शिक्षण सर्व घेतातच मात्र गुण देखील जास्त मिळायला हवे. आजच्या आधुनिक युगात जो शिक्षण घेत नाही तो आपले आयुष्य नीट जगू शकणार नाही. आजच पहिले तर सर्व ऑनलाईन झाले आहे त्यामुळे त्या सुविधा वापरण्यासाठी शिक्षण घेण्याची गरज आहे. अनेक मुले गरीब असतात त्यांना शिक्षण घेता येत नाही म्हणून ते काम करून शिकतात. मात्र जर लहानपणीच घरची परिस्थिती गरीब असेल तर मुलांचे हट्ट पुरवण्याची जवाबदारी वडिलांवर पडते.

आई वडिलांसाठी मुलं हि लाडकी असतातच मात्र अश्या लहान मुलांचे हट्ट पुरवायला ते परिस्थितीमुळे मागे पडतात. एका कुटुंबात आई वडिलांनी आपल्या मुलाला शाळा शिकवायची असं ठरवलंच होत मात्र त्यांच्याकडे मुलाला दप्तर घेण्यासाठी देखील पैसे नव्हते. बिना दप्तराचं मुलगा शाळेत कसा जाणार म्हणून वडिलांनी जी शक्कल लढवली त्याच आज संपूर्ण जग कौतुक करत आहे. हि घटना कंबोडिया मधील आहे. तेथील शिक्षकाने दप्तराचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासोबत शिक्षकाने लिहाल आहे की, अनेकदा आईवडील मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तू देखील पुरवू शकत नाहीत. शिक्षक पुढे लिहतात कि, दप्तर, पेन, पेन्सिल, रबर अश्या गोष्टी विकत घेण्यासाठी वडिलांकडे पैसे नसतात मात्र तुम्ही असे करू नका. केंग च्या वडिलांसारखे डोकं चालवा आणि मुलांच्या शाळेची तयारी करा. ५ वर्ष्यांचा गरीब मुलगा एनवाई केंग कम्बोडियाच्या शाळेत शिक्षण घेतो. तिकडे दप्तराची किंमत कमी कमी ४८८ रुपये आहे. मुलाचं शिक्षण व्हावं म्हणून केंग च्या वडिलांनी घरातच एक दप्तर बनवले आणि त्याला दिले. ते दप्तर शाळेत घेऊन गेल्यावर शिक्षकानीच नाही तर इतरांनीही केंग च्या वडिलांचा आदर केला आणि जगभर त्याचा प्रसार देखील केला. एका गरीब वडिलांना शाळेचे महत्व कळत असेल तर आपल्याला का नाही कळावे. शिक्षणामुळेच प्रगती आहे म्हणून मुलांना शिक्षणाची गोडी लावा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *