NMJOKE

कुत्रा जखमी झाल्यानंतर स्वतःच गेला दवाखान्यात, अशी मागितली मदत, पहा व्हिडीओ

कुत्रा हा पाळीव प्राणी आहे हे सर्वाना माहित असेलच. अनेकांना कुत्रे पाळायची त्यांच्यासोबत खेळायची आवड असते. तुम्ही कुत्र्यांचे व्हिडीओ देखील पहिले असतील ज्यामध्ये कुत्रा सुंदर दिसतो, कधी कोणाचे प्राण वाचवतो, तसेच कुत्रा परोपकारी,प्रामाणिक असतो हे देखील ऐकले असेल. यामुळेच लोक कुत्रा पाळतात. कुत्रा प्राणी खूप समजूतदार देखील असतो. पाळीव कुत्रा असेल तर तो आपल्या मालकाकडून अनेक गोष्टी शिकतो आणि स्थिरीनुसार तसे कृत्य करतो. सर्वच कुत्रे रात्रीच्यावेळी चोर, किंवा विचित्र लोक आले कि भुंकतात.

रस्त्यावर फिरणारे कुत्रे हे आपलं रोजचं जीवन भटकत जगात असतात आणि काहीतरी शिकत असतात. पाळीव कुत्र्याला काही लागले किंवा आजारी पडला तर लोक त्याला डॉक्टरकडे घेऊन जातात. मात्र रस्त्यावरील कुत्र्यांकडे पाहायला कोणीच नसते. मात्र इस्तंबूल या ठिकाणी अशी घटना पाहायला मिळाली आहे कि, एका रस्त्यावरील कुत्र्याने आपली बुद्धी लावून तो जनावरांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या कुत्र्याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खूप वायरल होत आहे. तो डॉक्टरांकडे जातो आणि असं नाटक करतो कि त्यामुळे डॉक्टरला वाटत कि तो कुत्रा आजारी आहे त्याचा इलाज करावा.

मेडिकल स्टोर चे मालक बानू सन्गीज ने सांगितले, कुत्र्याच्या पायाला लागले होते आणि रक्त देखील वाहत होते. अश्या अवस्थेत तो माझ्या मेडिकल पुढे आला आणि असे पाहू लागला जसे तो म्हणत आहे माझी मदत करा. या नंतर मी त्याला आत आणले ट्रीटमेंट सुरु केली त्यावेळी कुत्र्याने देखील प्रतिक्रिया देत पंजा हातात दिला. ट्रीटमेंटनंतर कुत्रा जमिनीवर असा लोळला जणू तो डॉक्टरांचे आभार मानात आहे. त्यानंतर बानू यांनी त्याला पाणी व जेवण देखील दिले. पहिला व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील आहे तर दुसऱ्या व्हिडिओत कुत्र्याचं क्लोजअप आहे. डॉक्टरांनी स्वार्थ न पाहता त्याची मदत केली त्यामुळे लोकांनी देखील व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आहे.

Exit mobile version