NMJOKE

आयसीसी चा मोठा निर्णय, नो बॉल मुले नाही होणार आता वाद

मित्रानो भारतातच नव्हे तर भारत बाहेर देखील क्रिकेट या खेळाचे लाखो चाहते आहेत. नुकतीच वर्ल्ड कप ची मॅच झाली आणि इंग्लडने वर्ल्डकप मिळवला. मात्र अनेकदा तुम्ही मॅच मधील चुकांमुळे रागावले असाल ज्यामुळे एका चेंडूच्या अभावामुळे देखील सामना हरला जाऊ शकतो असे प्रसंग घडले आहे. सामना खेळताना तुम्ही नो बॉल अनेकदा पहिले असतील मात्र अंपायर नो बॉल अनेकदा देत नाही. यामुळे सामना खेळात असताना वाद देखील उदभवण्याची शक्यता असते. अनेकदा नो बॉल मुले बॅट्समनला आउट देखील व्हावे लागले आहे.

ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांची मॅच असताना नो बॉल वरून मोठा वाद झाला होता. त्यानंतरच बीसीसी आय ने आयसीसी कडे यावर तोगड काढण्यास सांगितले होते. बॉंबे मिररने दिलेल्या माहितीनुसार आयसीसी ने नो बॉल वर तोडगा काढून एक नवे तंत्रज्ञान आणले आहे. हे तंत्रज्ञान खास नो बॉल मुळे होणारे वाद टाळण्यासाठी विकसित केले जाणार आहे. यामुळे नोबॉल मुले खेळाडूला होणारे मोठे नुकसान तसेच संघांमध्ये होणारे वाद आणि बीसीसीआय च्या तक्रारी बंद होतील. या नवीन तंत्रज्ञानात असे असणार आहे कि, जो बॅट्समन बॅटिंग करत असेल त्याच्या पायावर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे बसवले जातील. थर्ड अंपायर हे बॅट्समनच्या पायावर नजर ठेऊन असतील ज्यामुळे नोबॉल लगेच समजून येईल आणि होणारे मोठे वाद टाळता येतील. सध्या डीआरएस च्या माध्यमाद्वारे नोबॉल ची खात्री होत होती मात्र आता हे नवीन तंत्रज्ञान आल्यावर चांगला फायदा होईल. पुढील होणाऱ्या भारतातील सामन्यांमध्ये याचा प्रयोग होणार असल्याची माहिती देखील समजेल.
Exit mobile version