संजय दत्त ची पत्नी मान्यता सारखी दिसते त्यांची छोटी मुलगी, पहा फोटोस

आई आणि मुलीचं नातं एका मैत्रिणीपेक्षा कमी नसत. मुलींची पहिली मैत्रीण देखील आईच असते असं म्हणायला हरकत नाही. मुली आपल्या सर्व गोष्टी आईला सांगत असतात व मुली मोठ्या होत असतात. मुलीचे जास्त प्रेम वडिलांवर असते हे तुम्ही ऐकलं असेल आणि प्रत्यक्षात पाहिलं देखील असेल मात्र आई देखील मुलींसाठी तितकीच महत्वाची असते. आज आम्ही तुम्हाला अशीच एक बॉलिवूड चित्रपट सृष्टीमधील जोडी बद्दल सांगणार आहोत. आम्ही संजय दत्त आणि मान्यता दत्त यांची मुलगी इकरा बद्दल आज बोलणार आहोत.

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, मान्यता हि संजय दत्त याची तिसरी पत्नी आहे. या दोघांनी ७ फेब्रुवारी २००८ साली गोव्यात लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षयान्तर २१ ऑक्टोबर २०१० साली दोन जुळ्या मुलांचे आईवडील संजय आणि मान्यता दत्त बनले. त्यांनी मुलाचे नाव शहरान आणि मूळचे नाम इकरा ठेवले. मान्यता सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते मागच्या सोमवारीच मान्यतेने आपल्या मुलीसोबत एक सुंदर फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये मायलेकीने एकसारखाच ड्रेस घातला होता. स्वेटर आणि स्कर्टमधे दोघीही खूप सुंदर आणि क्युट दिसत होत्या. परदेशात शॉपिंग करतानाचा हा फोटो शेअर करत मान्यतेने लिहलं आहे कि, “सोबत राहा, सोबत मोठी हो, आनंदी राहा”. मान्यता आणि इकरा एकसारख्या दिसतात त्यामुळे अनेकांनी कमेंट देखील केली आहे कि दोघी एकसारख्या दिसता. संजय दत्त देखील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतो तो एकदा इंटरव्यू मध्ये म्हणाला होता कि, मुंबई मधल्या स्फोटात पकडल्यानंतर जेव्हा मी पुण्यात शिक्षा भोगत होतो तेव्हा मला मुलांची खूप आठवण यायची. मान्यता म्हणत होती त्यांना भेटायला आणू का मात्र संजय दत्त म्हणाला नको कारण त्यांनी मला अश्या अवस्थेत पाहिलेलं मला आवडणार नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *