NMJOKE

इराकच्या डोंगरांमध्ये मिळाले रामाचे निशाण, हे फोटो आहेत पुरावा

मित्रानो रामायण आणि महाभारत याविषयी तुम्ही ऐकून असाल. रामायणाचे आणि महाभारताचे अनेक पुरावे देखील आहेत ज्यामुळे ते खरोखर घडले असल्याचे समजते. भारतात रामाची पूजा केली जाते तसेच अनेक छोटी रामाची मंदिरे देखील भारतात आहेत. काही दिवसांपूर्वी इराकमधील चकित करून टाकणारी बातमी समोर आली आहे. इराकमध्ये रामाच्या अस्तित्वाविषयी मोठा दावा केला जात आहे. हा दावा अयोध्या शोध संस्थेने केलेला आहे. यानंतर इतिहासकार आणि शोध संस्थान यामध्ये जणू भांडण सुरु झालं आहे.

दाव्यामध्ये म्हटलं गेलं आहे कि, इराकमध्ये भगवान राम यांच्या अस्तित्वाचे काही प्रमाण मिळाले आहेत. मात्र असे असून देखील इतिहासकार त्याला नकार देत आहे. भगवान रामाचे अस्तित्व इराकमध्ये होते का नाही यावरूनच दोघांमध्ये वाद सुरु आहे. दोघेही आपला पक्ष सिद्ध करण्यासाठी पुरावे देत आहे यामध्येच इराकमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत डोंगरात कोरीवकाम दिसत असून राम आणि हनुमानाच्या प्रतिकृती असल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोंमुळेच इराकमध्ये रामाचे अस्तित्व होते असे म्हटले जात आहे.
अयोध्या शोध संस्थान चे प्रताप सिह म्हणतात कि, इराकमध्ये दरबंद-ई-बेलूला दगडावर ईस पूर्व २००० वर्ष्यांपुर्वीच भित्तीचित्र आहे. राज्याच्या हातात धनुष्य आणि हनुमान यावरूनच राम तेथे असल्याचे कळून येते. इतिहासकारांचा म्हणणं आहे कि, ते भित्तीचित्र इराक मधील डोंगराळ भागातील जनजातीचे प्रमुख टार्डउणी यांचं प्रतीक दर्शवते. इतिहासकार आणि अयोध्या शोध संस्था या दोघांमध्ये यामुळेच वाद सुरु आहेत. जेव्हा सत्य पुरावे समोर येतील तेव्हाच खरे काय आहे हे समजेल.
Exit mobile version