मित्रानो रामायण आणि महाभारत याविषयी तुम्ही ऐकून असाल. रामायणाचे आणि महाभारताचे अनेक पुरावे देखील आहेत ज्यामुळे ते खरोखर घडले असल्याचे समजते. भारतात रामाची पूजा केली जाते तसेच अनेक छोटी रामाची मंदिरे देखील भारतात आहेत. काही दिवसांपूर्वी इराकमधील चकित करून टाकणारी बातमी समोर आली आहे. इराकमध्ये रामाच्या अस्तित्वाविषयी मोठा दावा केला जात आहे. हा दावा अयोध्या शोध संस्थेने केलेला आहे. यानंतर इतिहासकार आणि शोध संस्थान यामध्ये जणू भांडण सुरु झालं आहे.

अयोध्या शोध संस्थान चे प्रताप सिह म्हणतात कि, इराकमध्ये दरबंद-ई-बेलूला दगडावर ईस पूर्व २००० वर्ष्यांपुर्वीच भित्तीचित्र आहे. राज्याच्या हातात धनुष्य आणि हनुमान यावरूनच राम तेथे असल्याचे कळून येते. इतिहासकारांचा म्हणणं आहे कि, ते भित्तीचित्र इराक मधील डोंगराळ भागातील जनजातीचे प्रमुख टार्डउणी यांचं प्रतीक दर्शवते. इतिहासकार आणि अयोध्या शोध संस्था या दोघांमध्ये यामुळेच वाद सुरु आहेत. जेव्हा सत्य पुरावे समोर येतील तेव्हाच खरे काय आहे हे समजेल.