शेतकऱ्याची मुलगी ते कशी बनली भारताची फ्लाईंग गर्ल, बघा हिमाची खरी कहाणी

आपल्या भारतात टॅलेंट कमी नाही प्रत्येक क्षेत्रात भारत देश पुढे आहे. आपल्या भारतात जातीव्यवस्था असल्याने तसेच जुन्या रूढी परंपरा दृढ झालेल्या असल्यामुळे अजूनदेखील मुली मागे आहेत. पूर्वी मुलींना फक्त चुल आणि मूल इतकाच स्थान होत मात्र महात्मा जोतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण देऊन मोलाचं पाऊल उचललं आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत मात्र तरीही काही खेडेगावामध्ये मुलींना स्वतंत्र दिले जात नाही. चंद्रावर देखील भारतीय मुलगी जाऊन आली आहे. मात्र आता हिम दास या मुलीने देखील मोठा इतिहास रचला आहे.

९ जानेवारी २००० साली जन्मलेल्या या १९ वर्षीय “हिमा दास” या मुलीने १९ दिवसांमध्ये ५ सुवर्णपदक भारतासाठी मिळवले आहेत आणि भारताची मान गर्वाने उंचावली आहे. बॉलिवूड अभिनेता असो वा मोठा क्रिकेटर सर्वानीच हिम दास च कौतुक केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हिम दास खूप चर्चेत आहे मात्र तिने यासाठी केलेले परिश्रम कष्ट याची जाणीव काहीच लोकांना असेल. आसाम मधील धिंग या छोट्याश्या गावात हिमा दास या मुलीचा जन्म झाला होता. हिमा आपल्या पाच भावंडा मधून सर्वात छोटी आहे.हिमा चे वडील शेती करतात आणि त्यांची परिस्थिती देखील अशी नव्हती कि ते हिमा ला खेळण्यासाठी मोठ्या अकॅडमी मध्ये टाकती. हिमा फुटबॉल खेळायची मात्र गावातील मैदानात, मुलगा असो किंवा मुलगी सर्वांसोबत ती खेळत असायची. थोडी मोठी झाल्यानंतर हिमा ने स्थानिक क्लब साठी फुटबॉल खेळला तेव्हाच तिला देशासाठी खेळण्याचं स्वप्न होत. २०१४ मध्ये एका शालेय स्पर्धेत ती पळत असताना तिच्या कौशल्याची जाणीव शम्स उल हक या शिक्षकांना झाली. नंतर कोच निपुण दास यांनी पहिल्यांदा तिला मैदानात मुलांना हरवताना पाहिलं होत. त्यानंतर निपुण दास हिमाच्या घरच्यांना भेटले आणि तिला एथिलिक्स मध्ये जाण्याची मागणी केली. खर्च झेपणार नसल्याने त्यानी नाही सांगितले मात्र कोच निपुण दास यांनी सुरवातीला हिमची खूप मदत केली. २०१८ मध्ये हिमा ला “वर्ल्ड यु २० चॅम्पियन शिप” मध्ये ४०० मीटर पळून विजय मिळाला. त्यानंतर रात्री हिमाने तिच्या घरी फोन केला आणि सांगितले कि मी असं केलं आहे. घरच्यांना याबाबद्दल काही माहिती नसल्याने ते म्हणाले आम्हाला झोपायचं आहे रात्र झाली आहे त्यानंतर हिमा म्हणाली झोपा. सकाळी जेव्हा तिचे वडील काकडी विकायला बाजारात जात असताना मीडियाच्या गाड्या हिमाच्या घारापुढे आलेल्या पाहून ते आनंदाने ओरडू लागले. हिमा वडिलांचा हा क्षण कधीही विसरू शकत नाही. हिमा पुढे जात गेली आणि शेवटी तिने जे करून दाखवले ते खूप प्रेरणादायी आहे. अनेक मुलींनी हिमाचा आदर्श घेण्यासारखं आहे. माहिती आवडल्यास शेअर नक्की करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *