Breaking News
Home / समाज प्रबोधन / टिक टॉक मुळे झाला या तरुणाचा मृत्यू, पहा व्हिडीओ

टिक टॉक मुळे झाला या तरुणाचा मृत्यू, पहा व्हिडीओ

मित्रानो काळ बदलला कि तंत्रज्ञानात देखील बदल झालेला तुम्ही पहिला असेल. काही वर्ष्यांपुर्वी लोकांना टीव्ही पाहायला नव्हता मात्र आता एलईडी सारखे आधुनिक टीव्ही आले आहेत. मोबाईलने तर इतकी प्रगती केली आहे कि त्यात संपूर्ण कम्पुटरच आहे. सोशल साईट्स देखील तुम्ही चालवत असाल असे म्हणण्या पेक्षा चालवताच असे म्हणणे योग्य राहील कारण आताची हि बातमी देखील तुम्ही सोशल साइट्समुळेच वाचत आहात. मोबाईलमध्ये नवनवीन गेम्स आणि एप्समुळे फायदा आहे तितकेच नुकसान देखील कारण सध्या चर्चेत असलेल्या टिक टॉक एप मुले एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे.

तुम्ही टिक टॉक ऍप पहिला नसेल तरी त्यातले व्हिडीओस मात्र पहिले असतील. या ऍप मध्ये गाणी अथवा डायलॉग्स असतात ज्यामध्ये आपण लिपसिंग करून किंवा वेगवेगळ्या कला सादर करून व्हिडीओ बनवू शकतो. व्हीडीओला आलेले लाईक पाहून लोक खुश होतात मात्र यामुळे एकाला जीव गमवावा लागला आहे. २२ वर्ष्यांचा ‘कुमारस्वामी’ नावाचा तरुण कर्नाटकमधील तुमकुरू येथे राहणारा होता. मैदानात फिरताना टिक टॉक साठी व्हिडीओ बनवावं असं त्याच्या मनात आलं. कुमारस्वामी च्या मित्राने कॅमेरा सुरु केला व स्लो मोशन मध्ये व्हिडीओ काढू लागला कारण व्हिडीओ चांगला यावा.

कुमारस्वामी पळत आपली मित्राच्या हातावर चढला आणि कोलांटीउडी खाली. उडी मारल्यावर त्याला पाय टेकवून जमिनीवर उभे राहायला हवे होते मात्र तसे झाले नाही. तो डोक्यावर जमिनीवर पडला त्यामुळे त्याची मान वाकली आणि मणक्याच हाड मोडलं. मित्रांनी हे पाहताच त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र ८ दिवस उपचार करून देखील तो वाचू शकला नाही. मित्रानो कुमारस्वामी त्याच्या घरातील एकुलता एक मुलगा होता आणि त्याने आपले प्राण गमावले. यामुळे नेहमी टिक टॉक च नाही तर इतर काहीही करत असाल तर काळजी घ्या. रिऍलिटी शो किंवा चित्रपटातील स्टंट करणारे लोक जेव्हा अशी कलाबाजी करतात तेव्हा त्यांच्यासोबत विशेष तज्ज्ञांची टीम असते त्यामुळे त्यांचे बघून ज्ञान नसताना स्टेण्ट करणं चुकीचं आहे.

Check Also

मांसाहार केल्याने कोरोना होतो का पहा

मित्रानो चीन मध्ये कोरोना वायरस या आजाराची लाट पसरली असल्यामुळे तेथील परिस्थिती खूपच भयावह आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *