NMJOKE

आईन्स्टाईन पेक्षा जास्त बुद्धिमान आहे हि ११ वर्ष्यांची मुलगी, ६ महिन्यांची असतांनाच लागली होती….

म्हणतात ना आजकालची नवीन पिढी खूपच हुशार आणि चतुर आहे. याच गोष्टीला ११ वर्षाच्या अनुष्का दीक्षितने सिद्ध करून दाखवले आहे. पाहिलं तर अनुष्का टॉप करणाऱ्या मुलांपेक्षा देखील जास्त बुद्धिमान आहे. ती इतकी बुद्धीनमान आहे कि, तिचा आयक्यू अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिन्स सारख्या महान शास्त्रज्ञांच्या आयक्यू पेक्षा प्रगतशील आहे. अनुष्काच्या बुद्धिमत्तेचा अंदाज तुम्ही याच गोष्टीवरून लावू शकता कि, तिने संपूर्ण पिरियॉडिक पाढे फक्त ४० मिनिटांमध्ये पाठ केले होते. अनुष्का लंडनला राहते मात्र ती मूळची भारतीय आहे.

अनुष्काने काही दिवसांपूर्वीच मेन्सा आयक्यू टेस्ट मध्ये सर्वात जास्त गुण मिळवले. अनुष्काला १६२ गुण या परीक्षेत मिळाले. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, जगातील सर्वात ज्ञानी आणि बुद्धिमान शास्त्रज्ञ स्वर्गीय स्टीफन हॉकिन्स यांनी देखील या परीक्षेत १६० गुण मिळाले होते. मात्र त्यांचा रेकॉर्ड देखील अनुष्काने तोडून १६२ गुण मिळवले आहेत. अनुष्काचे हे गुण पाहूनच आपण म्हणू शकतो कि अनुष्का स्टीफन हॉकिन्स पेक्षा जास्त बुद्धिमान मुलगी आहे. या टेस्ट मध्ये आपली बुध्दिमत्ता दाखून देण्यासाठी कमीत कमी १४० गुण असणे आवश्यक आहे.अनुष्काची आई आरती यांनी सांगितलं कि, अनुष्का जेव्हा सहा महिन्यांची होती तेव्हाच ती बोलायला शिकली होती. ती टीव्हीवरच्या जाहिराती पाहायची आणि ऐकायची नंतर त्याच कंजाहिराती बोलून दाखवायची. इतकंच नाही तर ती जेव्हा एक वर्ष्यांची होती तेव्हाच तिने देशाची नावे आणि राजधान्या पाठ करणं सुरु केलं होत. अनुष्काने या परीक्षेत ४ मिनिटात २८ कठीण प्रश्नांची उत्तरे दिली होती. अनुष्का म्हणते हे माझ्यासाठी इतकं अवघड नव्हतं पण वेळ कमी असल्याने माझ्यावर तणाव होता. इंग्रजी विषय अनुष्काला खूप आवडतो आणि नृत्याची देखील तिला आवड असून तिला डॉक्टर बनायचं आहे.
Exit mobile version