प्लास्टिक कचऱ्यापासून पेट्रोल बनवतो हा गावठी इंजिनिअर, किंमत आहे फक्त….

प्लास्टिक कचरा एक अशी वस्तू आहे ज्याच्यापासून सहजासहजी सुटका नाही. हा कचरा आपल्या पर्यावरणाला देखील नुकसान पोहचवतो. जास्तकरून समुद्र आणि पर्यटक स्थळांबद्दल पाहिले तर इथे या समस्या सर्वात जास्त पाहायला मिळतात. समुद्र किनारी माश्यांपेक्षा जास्त तर कचराच पाहायला मिळतो. जर असच चालत राहील तर पर्यावरण मोठ्या संकटात अडकेल. प्लॅस्टिकच्या काळ्या पिशव्या जमिनीत कुजून विष निर्माण करतात. अनेक लोक प्लास्टिक समस्या वर उपाय शोधात आहेत आणि त्यावर काम करत आहेत.

एक व्यक्ती आहेत प्रोफेसर सतीश कुमार यांनी खराब प्लास्टिक कचऱ्यापासून स्वस्त पेट्रोल बनवायचं तंत्र शोधून काढलं आहे. त्यांचा हा प्रयत्न भविष्यातील मोठी हानी होण्यापासून वाचवू शकतो. सतीश कुमार हे हैद्राबाद मधील एक इंजिनिअर आहेत. सतीश कुमार यांनी प्लास्टिक पासून पेट्रोल बनवायची एक कंपनी बनवली आहे. त्यांच्या या कंपनीत दररोज २०० लिटर पेट्रोल बनवले जाते. प्लास्टिक ला पेट्रोल बनवण्यासाठी तीन स्तरांची प्रक्रिया केली जाते. प्लास्टिक पॅरोलिसिस म्हटले जाते. सतीश म्हणतात कि ५०० किलो प्लास्टिक कचऱ्यापासून ४०० लिटर पेट्रोल बनवले जाऊ शकते. या प्रक्रियेसाठी पाण्याची गरज भासत नाही. या पेट्रोलपासून हवेचे वायुप्रदूषण देखील होत नाही तसेच हि प्रोसेस व्हॅक्युम प्रणालीवर आधारित आहे. सतीश म्हणतात या कामामधून मला पैसे कमवायचे नाहीत तर पर्यावरणाला सुरक्षित ठेवायचे आहे. ते आपल्या या तंत्राला, युक्तीला इतर कंपन्यांना देखिल सांगायला तयार आहेत जेणेकरून प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्तता मिळेल. २०१६ मध्ये सतीश यांनी या कमला सुरुवात केली होती आणि त्यांनी आजवर ५० टन प्लास्टिक कचऱ्याचे पेट्रोल बनवले आहे. त्यांनी बनवलेले हे पेट्रोल ४० रुपये प्रतिलिटर ते विकतात. फक्त पेट्रोलचा नाही तर डिजेल आणि विमानाचे इंधन देखील ते बनवतात. सतीश यांच्या या कार्याला खरोखर सलाम, तुम्हाला देखील त्यांचे कार्य आवडले असल्या पोस्ट शेअर नक्की करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *