पावसाळा आला आहे, हा व्यवसाय करून तुम्ही हजारो रुपये रोज कमाऊ शकता

मित्रानो आपल्याकडे १२ महिन्यात ३ ऋतू असतात त्यापैकीच एक पावसाळा आहे. प्रत्येक ऋतू हा साधारणपणे ४ महिन्यांचा असतो म्हणजेच पाऊस देखील चार महिने असणार. आता जर तुम्ही छोटे मोठे काम करत असाल आणि तुमच्याकडे रोज जर ५ ते ६ तास वेळ असेल किंवा तुमचे कोणते दुकान असेल तर तुम्ही रोज हजारो रुपये कमाऊ शकता. खूप कमी पैसे भांडवलात गुतंवून तुम्ही हा व्यवसाय करू शकता जो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पावसाळा आला म्हणजे पाण्यापासून वाचण्याची साधने लोकांना लागणारच.

पावसाळ्यात तुम्ही छत्री, रेनकोट, मच्छर दाणी, रबरी चपला, ताडपत्री अश्या कितीतरी पावसाळ्यात उपयोगी असणाऱ्या वस्तू विकू शकता. पावसाळ्यात जास्त रेनकोट आणि छत्री ची जे तुम्ही ५ ते १० हजार रुपये खर्च करून याचा व्यवसाय करू शकता. तुम्ही हे एखाद्या ठिकाणी ताडपत्री अंथरून देखील विकू शकता किंवा हाटगाड्यावर फिरून देखील विकू शकता. तुमचा धंदा जास्त झाल्यावर यात आणखीन गुंतवणूक करून तुमचा व्यवसाय वाढवू शकता. तुम्हाला सुरवातीला ५ ते १० हजार रुपये गुंतवावे लागतील जर तुमचे दुकान असेल तर तुम्ही दुकानात देखील या वस्तू विकायला आणू शकता.मुंबईमधील क्राफर्ट मार्केटमध्ये ओलसेल दारात तुम्हाला या सर्व वस्तू मिळतील तसेच दादर ला देखील जाऊन तुम्ही माल घेऊन येऊ शकता. तुम्ही २५ ते ३० टक्के मार्जिन ठेऊन या वस्तू विकू शकता व हजारो रुपये कमाऊ शकता. रोज किमान १० छत्र्या व १० रेनकोट जरी विकले गेले तरी तुमचे खूप प्रॉफिट होईल. तुम्ही यात स्वतःचे डोके लावून आणखीन वाढ करू शकता आज एका मार्केट मध्ये तर उद्या दुसऱ्या मार्केट मध्ये विकल्यास गिर्हाईक देखील जास्त मिळतील. आकर्षक व टिकाऊ माल असेल तर ग्राहक तुमच्याकडून नक्कीच वस्तू विकत घेईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *