घरच्यांनी मृत समजून सुरु केली अंतिम संस्कार ची तयारी, नंतरचे दृश्य पाहून सगळे चकित झाले

जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून कोणी वाचू शकत नाही, ज्याने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. आज विज्ञानाने किती प्रगती केली आहे मात्र मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते याच उत्तर एक रहस्यच आहे. तुम्ही टीव्हीवर अथवा अनेक चित्रपटांमध्ये पहिले असेल कि मृत्यूनंतर माणूस जिवंत झाला आहे किंवा त्याचा पुनर्जन्म झाला आहे. अशीच एक घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे ज्यामध्ये मृत्यूनंतर पुन्हा एक व्यक्ती जिवंत झाला. होय खरोखर एक मृत व्यक्ती जिवंत झाली आहे आणि याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चेन्नई मधील धारवाड येथील मनागुंडी येथे हि मानवी अस्तित्वाला चकित करून टाकणारी घटना घडली आहे. मारवेड गावातील एका व्यक्तीला कुत्रा चावला होता त्यानंतर त्याला खूप जास्त ताप आला. ताप आल्यामुळे त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले गेले होते. रुग्णालयात त्याला दाखल केल्यानंतर त्याची तब्बेत आणखीन बिघडली व डॉक्टरांनी त्याला वेंटीलेटरवर ठेवले मात्र त्याच्या शरीरात संक्रमण पसरू लागत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्या युवकाला व्हेंटिलेटर वर ठेवायचे का नाही हा निर्णय त्याच्या घरच्यांना घायचा होता.घरच्यांनी त्याला व्हेंटीलेटरवरून काढण्यास सांगितले व त्याला घरी घेऊन गेले. घरी नेल्यानंतर त्याचे हात पाय काम करणं बंद झालं, त्याच दृदय पण धडधड करत नव्हतं. त्या व्यक्तीला मृत समजून घरच्यांनी त्याच्या अंतिम संस्काराची तयारी केली. अंतिम संस्काराचे विधी सुरु असताना अचानक त्याने डोळे उघडले व उठून बसला. तो उठल्यामुळे सगळे लोक चकित झाले आणि त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर पुन्हा उपचार सुरु आहेत. म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच काही या युवकांसोबत देखील घडले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *