केनियाच्या खासदाराची माणुसकी, २३ वर्षाची उधारी परतवण्यासाठी औरंगाबादमध्ये आले

मित्रानो कोणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. तरुणपणी अनेक कल्पना तरुणांच्या मनात येत असतात त्यावेळी ते शिक्षण घेत असतात. फक्त शिक्षण घेत असल्याने त्यांना घरच्यांनी दिलेल्या पैशांवर अवलंबून राहावे लागते. गरीब आणि मध्यमवर्गीय पालक शिक्षणापुरता आणि होस्टेलपुरता खर्च मुलांचा करू शकतात त्यामुळे तरुणांच्या कल्पनांना वाव देणं शक्य नसत. शिक्षण पूर्ण करून मुले जॉब करतात आणि पैसे जमवून कल्पनांना वाव देतात व त्याच पैश्याने एखादा धंदा करतात तर काही शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरीला रुजू होतात.

जवळपास ३० वर्षयांपूर्वी केनिया मधून एक तरुण शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आला होता. १९८५ ते १९८९ च्या दरम्यान केनियामधून रिचर्ड टोंगी हा तरुण औरंगाबाद मध्ये आला होता. त्या वेळी रिचर्डला एका दुकानदाराने खोली देखील शोधून दिली होती. काशिनाथ गवळी या दुकानदाराने रिचर्डला त्यावेळी २०० रुपयांची उधारी दिली होती आणि रिचर्ड लागणारे सामान देखील त्यांच्या दुकानातून घेऊन जात होता. रिचर्ड हा मौलाना आझाद या महाविद्यालयात शिक्षण घेत होता.शिक्षण पूर्ण झाल्यावर रिचर्ड टोंगी मायदेशी परतला व तिकडे तो आता खासदार आहे. संरक्षण समितीचा उपप्रमुख देखील सध्या रिचर्ड टोंगी आहेत. भारत भेटीसाठी आल्यानंतर रिचर्डला आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव झाली आणि त्यांची उधारी परतवण्यासाठी त्याने काशिनाथ याना भेट दिली. काशिनाथ यांच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले कारण तो मुलगा आता इतका मोठा झाला होता आणि तरीही उपकार फेडण्यासाठी त्यांच्या घरी गेला. रिचर्ड ने काशिनाथ यांचे आभार देखील मानले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *