लॉज च्या रूम मध्ये रडताना दिसली कॅप्टन सर्फराज ची पत्नी, या कारणामुळे कुटुंबाला….

१६ जून ला भारत पाकिस्तान ची संपूर्ण वर्ल्डकप च्या वेळेमधील १२ वि मॅच होती. पाकिस्तान सोबत असलेला हा सामना भारताने पुन्हा एकदा जिंकला. हा सामना जिंकल्यानंतर भारताने १२ वेळा पाकिस्तानवर विजय मिळवला आणि आपला रेकॉर्ड कायम ठेवला. भारतात जितके लोक आतुरतेने क्रिकेटचा सामना पाहतात तितक्याच आतुरतेने पाकिस्तानी लोक देखील सामना पाहत असतात. प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या लोकांचा अपमान होतो मात्र यावेळी पाकिस्तानच्या कॅप्टनच्या पूर्ण कुटुंबाला अपमान भोगावा लागत आहे.

एका लॉज (हॉटेल) च्या रूम मध्ये कॅप्टन सर्फराज ची बायको रडताना दिसली आहे. सर्फराज ची पत्नी का रडत होती याच कारण आपण आता पाहणार आहोत. क्रिकेट सामन्या नंतर लोक आपल्या भावना व्यक्त करतात मात्र लोक हे विसरतात कि तो एक खेळ आहे. खेळांमध्ये दोन संघांपैकी एक संघ विजयी होणार तर एक हरणार असतो मात्र पाकिस्तानी जनता पाकिस्तानी क्रिकेट संघाला टोमणे मारत आहे. पाकिस्तानी जनतेच्या अनुसार पाकिस्तानने त्यांचा संघ विजयी झाला पाहिजे अशी अपेक्षा करते मात्र असे घडले नाही.

पाकिस्तान पराभव झाल्याने संघाचा कॅप्टन सर्फराज सोबत त्याच्या कुटुंबालाही लोक दोष देत आहेत. एका चाहत्याने सर्फराजला एक व्हिडीओ दाखवला नंतर तो व्हिडीओ वायरल झाला आणि सर्फराजच्या पत्नीने देखील पहिला. जेव्हा सर्फराज हॉटेल रूम मध्ये पोहचला तेव्हा त्याला त्याची पत्नी रडताना दिसली. सर्फराज च्या पत्नीला वाटत होते कि आपल्या नवऱ्याची सगळीकडे खिल्ली उडवली जात आहे म्हणून ती रडत होती. सर्फराजने पत्नीला खूप समजावले त्याने पत्नीलाच नाही तर आपल्या कुटुंबाला देखील खूप समजावले. पाकिस्तान सतत हरत असल्याने लोक नाराज झाले आणि त्यांनी संघाच्या कप्तानलाच दोष दिला म्हणून हा असा प्रकार घडला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *