NMJOKE

भारताच्या या राज्यात दुधाची रिकामी थैली परत केल्यावर मिळतील ५० पैसे परत

मित्रानो २०१८ मध्ये महाराष्ट्रात अनेक नियम लागू झाले होते त्यापैकीच एक म्हणजे प्लास्टिक बंदी. प्लास्टिक बंदी केल्यामुळे महाराष्ट्रात अनेक कंपन्या ज्या प्लास्टिक च्या पिशव्या बनवत होत्या त्या बंद झाल्या तसेच अनेकांना प्लास्टिक देताना पकडल्याने त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला गेला. प्लास्टिक बंदी केल्यामुळे जवळपास ५० टक्के प्लास्टिक कचरा कमी झाला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पॉलिथिन प्लास्टिक रिसायकल करण्यासाठी एक चांगले पाऊल पुढे ठेवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीनंतर प्लास्टिक पासून बनणाऱ्या वस्तू जसे प्लास्टिक बाटल्यांचा कारखाना, प्लास्टिक चे ग्लास, प्लास्टिकच्या पिशव्या यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण आढळून आली आहे. अश्यातच दुधाची पिशवी याला अपवाद आहे कारण दूध हे प्लास्टिक पिशवीमध्ये विकणे बंद नाही झाले. यामुळेच महाराष्ट्र सरकारने दूध प्लास्टिक पिशवीत विकणाऱ्या सर्व कारखान्यांना निर्देश दिले आहेत कि त्यांनी आपल्या ग्राहकांसाठी बाय बॅक स्कीम आणावी. या स्कीमनुसार जो कोणी ग्राहक दुधाची पिशवी विकत घेईल आणि दूध वापरून ती रिकामी पिशवी पुन्हा दुकानदाराला देईल तर त्याला त्या रिकाम्या पिशवीचे ५० पैसे दिले जातील. या स्कीमनुसार जर तुम्ही जर रोज एक पिशवी विकत घेत असाल व ती पिशवी न फेकता साठून ठेवत असाल आणि एकदम दुकानदाराला दिल्या तर १५ रुपये तुम्हाला महिन्याला मिळतील व प्रदूषणाला देखील आला बसेल. त्याच प्लॅस्टिकच्या पिशवीचे रिसायकल देखील कंपनी करेल म्हणजेच यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्यापासून वाचू शकते.
Exit mobile version