लहान वयात लकवा लागल्याने शरीराचा अर्धा भाग निकामी झाला, आता आहे भारताच्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक

एक मुलगा पाचवी नंतर एका सरकारी शाळेत शिकायला गेला. आठ वर्ष्यांचा असताना तो मुलगा शाळेतून घरी येत होता. घरी येत असताना अचानक तो जमिनीवर कोसळला, त्याचे अंग कापू लागले. शरीर कडून गेलं. त्यावेळी त्यासोबत असणाऱ्या मुलांच्या वाटलं कि याच शरीर कश्यामुळे आखडलं याच्या अंगात भूत तर नाही ना शिरलं. त्यानंतर घरच्यांनी त्याला सरकारी रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला लकवा(पॅरालिसिस) लागला असल्याचे सांगितले. त्या मुलाची डावी बाजू खराब झाली आहे त्यामुळे तो जीवनभर विकलांग, अपंग राहील.

हरियाणामधील महेंद्रगड या जिल्ह्यातील हजारीबाद सय्यदलापूर गावात राहणारा तो मुलगा “रामकिशन यादव” म्हणजेच आजचे “बाबा रामदेव”. मात्र आपण बाबा रामदेव यांची वाटचाल पाहणार आहोत. लकवा लागल्याने रामकिशन अपंग झाला होता मात्र त्याने अपयश येऊ दिले नाही. खेळाचं मैदान हरपल्यान रामकिशनने पुस्तकांचा आधार घेतला. त्यावेळीच त्या मुलाच्या हाती योग अभयसाच एक पुस्तक लागलं ज्याच्या पहिल्या पानावर लिहलं होत कि, योगा केल्याने तन आणि मन दोघांवर नियंत्रण मिळवता येत.पुस्तकातील ते वाक्य वाचून रामकिशन रोज योगा करू लागला. आपल्या अपंगत्वावर रोज तो मात करत होता. आज जर तुम्ही बाबा रामदेव याना पाहिलं तर त्यांचं पूर्ण शरीर चांगलं आहे आणि त्यांना लकवा झाला होता असं वाटणार देखील नाही. फक्त त्याचा डावा डोळा निकामी आहे बाकी पहिले तर सामान्य माणसापेक्षा स्वस्थ आणि मजबूत आहे. योगा करण्यामुळे हे शक्य झालं आणि त्या मुलाने अपंगत्वावर, रोगावर विजय मिळवला. पुढे रामकिशन या मुलाने खानापूर येथील गुरुकुलात प्रवेश घेतला. तेथे बालकृष्ण सोबत त्याची भेट झाली. रामकिशन याना योगा सोबत आध्यात्मामध्ये रुची होती. अध्यात्माच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी रामकिशन कालवा आश्रमात गेले. तेथे त्यांच्या दुसऱ्या गुरूंनी आचार्य बलदेव यांनी रामकिशन चे नाव बदलून “रामदेव” ठेवले. पुढे रामदेव “संस्कार” चॅनेलवर योगा शिकाऊ लागले त्याचे प्रक्षेपण रोज सकाळी होऊ लागल्याने त्यांना ओळख मिळाली आणि आज ते खूप मोठे श्रीमंत व्यक्ती देखील आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *