ईशा अंबानी आपल्या नवऱ्यासोबत राहते या बंगल्यात, पहा आतील फोटो

२०१८ च्या शेवटच्या महिन्यात एकामागे एक अनेक मोठ्या दिग्गजांचं लग्न झालं. मोठ्या दिग्ग्जनी केलेले लग्न मोठे असल्याने खूप चर्चा रंगत होत्या कारण या लग्नांमध्ये करोडोंचा खर्च झाला. अनेकांनी परदेशात जाऊन साखरपुडा केला तर भारतात लग्न केलं, रिसेप्शन देखील खूप मोठे झाले. अश्यातच भारताचे सर्वात मोठे उद्योगपती कुटुंब अंबानी खानदानातील मुलीचं देखील लग्न झालं. ईशा अंबानींचा लग्न हिऱ्यांचे व्यापारी असलेल्या आनंद पिरामल सोबत झालं. तुम्हाला याबद्दल तर माहितीच असेल.

ईशा अंबानींच्या लग्नानंतर तिला आणि तिच्या पतीला आनंद पिरामल याना ईशाच्या सासर्याने २५० करोडचा बंगला भेट केला होता. या बंगल्याची चर्चा देखील खूप झाली होती आणि ते राहायला देखील तेथे गेले. आज या बंगल्याच्या आतील फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. अंबानी कुटुंबाची एकुलती एक मुलगी ईशा असल्याने खूपच धमाकेदार हे लग्न झाले होते. ईशाला भेट मिळालेला हा बंगला ५ मजल्यांच्या आहे व त्याचे नाव गुलिटा बंगला आहे. अतिशय सुंदर आणि आलिशान असणारा हा बंगला साऊथ मंदिर वरळी येथे आहे.२०१२ सालीच ईशाच्या सासर्याने हा बंगला विकत घेतला होता आणि त्याचे काम देखील तेव्हाच सुरु होते. ईशा आणि आनंद ला हा बंगला लग्नाचं बक्षीस म्हणून आनंदच्या वडिलांकडून मिळाला होता. ५०,००० वर्ग फूट मध्ये पसरलेला हा बंगला आता ४५० करोड रुपयांचा आहे. एक लॉन, तीन बेसमेंट, मोकळ्या हवेत स्विमिंगपूल आणि अनेक खोल्या आहेत. तुम्ही फोटो पाहूनच चकित झाला असाल. डायमंड थीम वर आधारित असलेला हा बंगला खूपच आलिशान आणि सुंदर आहे.

2 thoughts on “ईशा अंबानी आपल्या नवऱ्यासोबत राहते या बंगल्यात, पहा आतील फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *