प्रेमास नकार दिल्यामुळे तरुणाने तरुणींसमोरच नदीत….

प्रेम हे कोणावरही होऊ शकते. शक्यतो तरुणपिढीत मुलांना मुलींवर प्रेम होते तसेच मुलींना मुलांशी प्रेम होते. प्रेमात असणारी जोडपी प्रेयसी साठी किंवा प्रियकराला वेडी झालेली असतात ते एकमेसाठी काहीही करायला तयार असतात. खर पाहायला गेलं तर ते एक आकर्षण असत मात्र नवीन तरुणाईत आलेल्या मुलांना त्याविषयी फारस काही माहित नसत. एकमेकांच्या प्रेमात बुडाल्यामुळे जर प्रेमभंग झाला तर काहीही करायला प्रियकर अथवा प्रेयसी तयार असते. मग तो कोणाचा जीव घ्यावा लागो किंवा जीव द्यावा लागो.

अशीच एक घटना सांगलीमध्ये घडली आहे. सांगलीतील एका २४ वर्ष्याच्या तरुणाने आपल्या एकतर्फी प्रेमामुळे जीव दिला आहे. अब्रार झाकीर मुलानी या तरुणाने तरुणींसमोरच नदीत उडी टाकून आपले प्राण गमावले. अब्रार ला सतत एक मुलगी नकार देत होती मात्र त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. अब्रारने मुलीला फोन करून महत्वाचे बोलायचे आहे असे सांगून तिला बाईकवर बसवले आणि कृष्ण नदीजवळील स्वामी समर्थ घाटावर नेले. काही वेळ तिकडच्या पायऱ्यांवर बसून अब्रार सतत म्हणत होता मला तू खूप आवडतेस मात्र मुलगी म्हणत होती आपण मित्रच राहू.मुलीच्या अश्या बोलण्याने अब्रार संतापाने उठला आणि आपला मोबाईल व गाडीची चावी तिच्याकडे देऊन म्हणाला तू इथेच थांब मी नदीकडे जाऊन येतो. नदीच्या किनाऱ्याहून अब्रार नदीच्या मध्यभागी जात होता तेव्हा तो बुडू लागला व नंतर तरुण मुलीला घटना लक्ष्यात आल्याने तिएन आरडाओरड केली. लोक जमा झाले व काही त्याला वाचवण्यासाठी गेले मात्र तो बुडाला होता यामुळे त्याचे प्राण गेले. जवळपास सहा तासांनी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले. तरुणीची जाब लिहून घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *