सपना चौधरी सल्ला देत म्हणाली, कधी आपल्या मुलीला डान्सर बनवू नका …..

सलमान खान च्या बिग बॉस सीजन ११ ची सहभागी राहिलेली सपना चौधरी ला आज कोण नाही ओळखत. सपना हि हरियाणा ची प्रसिद्ध डान्सर आहे, जी पहिले फक्त हरियाणा मधेच प्रसिद्ध होती. बिग बॉस मधून बाहेर आल्या नंतर सपना ची फॅन फॉलोईंग अजून वाढली आणि आता तिला हरियाणा च्या बाहेर हि लोक ओळखतात व पसंद देखील करतात. बिग बॉस च्या आदी सपना चौधरी एक सभ्य मुलगी होती पण घरातून बाहेर आल्या पासून ती मॉडर्न झाली आहे. ती नेहमीच तिच्या लूक्स आणि ड्रेससिंग साठी चर्चेत असते. पण आज आपण एका वेगळ्या गोष्टी वर चर्चा करू, कारण सपना चौधरी च म्हणणं आहे कि तुम्ही कधी तुमच्या मुलीला डान्सर नका बनवू. चला पाहू नेमकी काय झाल होत.

हल्ली सोशल मीडिया वर एक व्हिडियो खूप वेगाने पसरत आहे. जो हरियाणा मधील आहे, ज्याच्यात ती डान्स करतांना दिसत आहे. नेहमी सारख जेव्हा तिचा डान्स संपला तेव्हा लोकांनी तिला परत तो डान्स करण्या साठी विनंती केली. पण जेव्हा ते शांत नाही झाले तेव्हा सपना ने स्वतः माईक घेऊन त्यांना शांत राहायला सांगितल. काही वेळा नंतर जेव्हा काही लहान मुल स्टेज वर तिच्या सोबत डान्स करायला गेले, तेव्हा तिने सगळ्या मुलांना स्टेज वर बोलावल आणि माईक हातात घेत म्हणली कि जर “तुम्हाला असा गैरसमज असेल कि तुम्हाला आपल्या मुली ला डान्सर बनवायच आहे, तर माझा तुमच्या साठी एक सल्ला आहे कि कधी तिला डान्सर नका बनवू”.सपना इथेच नाही थांबली ती पुढे बोलली कि “आपण आपल्या कष्टाने काहीहि बना, पण डान्सर नका बनू. कारण अनेक लोकांना हौस असते सपना चौधरी बनायची, पण ते बनन सोप्प नाही. माझी इच्छा आहे कि मुलींनी खूप शिकून आपल नाव कराव, कारण मला अस वाटत कि जी गोष्ट मी सहन केली आहे, ती कोणीही करू नये. म्हणून माझी अशी इच्छा आहे कि या जगातून डान्सर च अस्तित्वच मिटलं पाहिजे”. सपना चौधरी हरियाणा ची डान्सर आहे आणि तिने नेहमी पंजाबी ड्रेस वर डान्स केला आहे. हल्ली सपना चौधरी ने मुरादाबाद च्या रैलवे स्टेडियम मध्ये एक प्रोग्रॅम केला होता. तिला बघूनच तिकडची गर्दी अनियंत्रित झाली. ज्याचा नंतर तिच्या वर अश्लीलता पसरवण्याचा चा आरोप लावला होता आणि तिच्या विरुद्ध तक्रार देखील नोंद झाली होती. तिच्या विरुद्ध तक्रार अशी होती कि तिनी प्रोग्रॅम मध्ये अश्लील डान्स केला होता आणि डीजे पण रात्री उशिराच बंद केला होता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *