५ वर्ष्यांपासून वडिलांसोबत तुरुंगात राहत होती चिमुकली मुलगी, कलेक्टर साहेबानी असे केले ज्यामुळे….

मित्रांनो आपण एका अश्या जगात जगत आहोत, जिथे अशी मुल आहेत ज्यांना शिकायच तर आहे. पण त्यांची परिस्तिथी चांगली नसल्या मुले ते शिक्षण नाही घेऊ शकत. आज हि आपल्याला असे अनेक मुल भेटतील ज्यांची मनापासून शिकायची इच्छा आणि आपल भविष्य सुधरवायची इच्छा देखील असते. पण ते बोलतात ना श्रीमंत माणूस अजून श्रीमंत होत चाललाय आणि गरीब माणूस अजून गरीब होत चाललाय. आपल्या ह्या जगात असे खूप कमी लोक असतील जे गरज असलेल्या लोकांची मदत करतात. आज आपण अश्याच एका व्यक्ती बद्दल बोलू ज्याने एका ६ वर्षा च्या मुलीच जीवन बदलल.

आशा नावाची एक सहा वर्षा ची मुलगी आहे. आशा ची आई तिला जन्म देताच वारली होती. त्या नंतर ती तिच्या वडलां सोबत राहिली. पण जेव्हा आशा ६ महिन्यांची होती तेव्हा तिच्या वडलांनी एक गुन्हा केला, ज्या मुळे त्यांना तुरुंगवास झाला. आशा ला सांभाळायला तिच्या वडलांच्या वैतरिक्त अजून कोणीही नसल्या मुळे तिला सुद्धा तिच्या वडलांसोबत तुरुंगातच राहून दिल. जेल मध्ये आशा ला सांभाळायची जबाबदारी जेल अधिकारींनी जेल मधल्या महिला कैदीनां दिली. आज आशा ६ वर्षा ची आहे. तिला तिथेच जेल मधल्या प्लेस्कूल मध्ये शिकवल जात होत, तिला देखील शिकायचे खूप वेड होत. अश्यात जेव्हा एकदा बिलासपूर चे कलेक्टर डॉ. संजय अलंग जेल ची तपासणी करायला गेले, तेव्हा त्यांना तिथे आशा भेटली.कलेक्टर डॉ. संजय ने जेव्हा आशा ला विचारल कि तिला काय करायचे आहे, तर तीने प्रेमाने उत्तर दिले कि तिला जेल मधून बाहेर निघून शिक्षण घ्यायचे आहे. ६ वर्षा च्या ह्या मुलीचं उत्तर कलेक्टर साहेबांच्या मनात भरलं, मग काय त्यांनी लगेच तीच नाव शहरातल्या एका चांगल्या शाळेत दाखल केल आणि त्या शाळेच्या हॉस्टेल मध्ये तिच्या राहण्याची व्यवस्था पण केली. त्यांच्या ह्या चांगल्या कामा मध्ये त्यांची सहायता शहरातल्या लायन्स क्लब ने पण केली. जेव्हा कलेक्टर साहेबांना त्या लहान मुली ला केलेलया मदती बद्दल विचारल, तेव्हा ते बोलले कि “कोणत्या हि व्यक्ती च्या जीवनात एक सकारात्मक बदल येन शक्य आहे. म्हणून आपल्याला देखील सहायते साठी पुढे यायला पहिजे. कोणत्या हि मुलाची पार्श्वभूमी न बघता आपल्याला त्या मुलाला जीवनात पुढे जाण्याची एक तरी संधी द्यायला पाहिजे. आपला एक छोटासा प्रयत्न एका व्यक्ती च पूर्ण जीवन बदलू शकत”. डॉ. संजय अलंग ला पण शिकायची खूप हाउस आहे. ते एक लेखक पण आहेत आणि त्यांनी अनेक पुस्तक देखील लिहिलेत. त्यांना त्यांच्या पुस्तक आणि कवितां साठी ‘राष्ट्रकवी दिनकर सन्मान’,’भारत गौरव सन्मान’ आणि ‘सेवा शिखर सन्मान’ ने पण सन्मानित केल आहे. खरंच या महान व्यक्तीला माझा सलाम.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *