शहीद अक्षय च्या बायको ने लिहल पत्र, म्हणाली अजून नाही धुतली त्यांची वर्दी,जेव्हा खूप आठवण येते तेव्हा….

मित्रांनो आपल्या देशा साठी सर्वात मोठं बलिदान जर कोण देत असेल तर ते असतात सीमे वरती असलेले आपले सैनिक. जे फक्त आपण सुखात जीवन जगू त्या साठी स्वतःचा जीव पणाला लावून आपली रक्षा करतात. अनेक सैनिकांच पूर्ण जीवन सीमे वरतीच जात आणि त्यांची आपली मानस फक्त त्यांची वाट बघत राहतात. दर वर्षी अनेक सैनिक सीमे वर ड्युटी करत शाहिद होतात आणि त्यांच्या गेल्या नंतर त्यांच्या कुटुंबच दुःख हे आपल्याला नाही समझणार. पण अश्याच एका शहीद झालेल्या सैनिका च्या बायको ने तिच्या हृदयाचे झालेले हाल शेयर केले आहे.

अक्षय गिरीश कुमार हे उत्तर प्रदेश च्या जौनपूर जिल्ल्या चे राहणारे आहेत. जे २०१६ मध्ये जम्मू-काश्मीर च्या नगरोट मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. त्या हल्ल्यात एकूण ७ सैनिक शहीद झाले होते. मेजर अक्षय गिरीश च्या शहीद झाल्या नंतर त्यांच्या कुटुंबाने खूप काही सहन केल आहे. हल्लीच मेजर अक्षय गिरीश यांची पत्नी संगीता रवींद्रन यांच एक पत्र व्हायरल होत आहे, ज्याच्यात तिनी त्यांचे प्रपोज ते शाहिद झाल्या पर्यंतची पूर्ण कहाणी सांगितली आहे. संगीता ने पत्रात लिहल आहे कि २००९ मध्ये मेजर अक्षय ने स्वतः तिला प्रपोज केल, ज्याच्या नंतर त्यांनी २०११ मध्ये लग्न केल. लग्ना च्या २ वर्षा नंतरच त्यांना एक मुलगी झाली, जिच नाव त्यांनी नैना ठेवल. तिनी हे पण सांगितल कि ती सुरवाती पासून मेजर अक्षय सोबतच राहिली होती, जिथे त्यांना रूम भेटलेला. लग्ना नंतर ते पुण्याला रायहायला आले होते, पण काही दिवसानंतर त्यांच ट्रान्सफर जम्मू-काश्मीर च्या नेगरोट मध्ये झाल. नेगरोट मध्ये त्यांना घर नाही भेटल पण तिला त्यांच्या पासून लांब न्हवत राहायच आणि आपला पूर्ण वेळ त्यांनाच द्यायचा होता म्हणून ती त्यांच्या सोबतच राहिली. संगीता रवींद्रन ने मेजर अक्षय ज्या दिवशी शहीद झाले त्या दिवसाची पूर्ण कहाणी पण सांगितली. तिने लिहल कि २९ नोव्हेंबर च्या सकाळी ५:३० वाजता त्यांना अचानक आलेल्या गोळ्यांच्या आवाजाने त्यांची झोप तुटली त्यांना वाटल कदाचित ट्रेनिंग चालू असेल. पण मग ५:४५ ला एका जुनियर ने सांगितल कि आतंकवादीयांनी तोप खाण्याच्या रेजिमेंट ला बंदी बनवलं आहे, ज्याच्या नंतर मेजर अक्षय तिला बोलले कि तिला याच्या बद्दल लिहायला पाहिजे.
त्या वेळीस तिथे असलेल्या महिलांना आणि लहान मुलांना एका सुरक्षित जाग्यावर नेलं, मग संगीता ने तिच्या सासरच्यांना मॅसेज केला आणि सांगितलं कि ते आता लढाईत आहेत. जेव्हा खूप वेळा नंतर हि ते आले नाही तेव्हा संगीता ने मेजर अक्षय ला फोने केला, तेव्हा तिकडच्या एका व्यक्ती ने सांगितलं कि त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेलं आहे. संध्याकाळी ६ वाजता काही अधिकारी मला भेटायला आले आणि सांगितल कि त्यांनी अक्षय ला गावमले आहे. हे ऐकल्या नंतर संगीता खूप दुखी झाली. काही वेळा नंतर तिला मेजर अक्षय च सगळ सामान दिल आणि ती परत घरी गेली. पुढे ती लिहत म्हणाली कि,नैना ला समझवण कठीण होत पण तिने तिला सांगितलं कि तुझे वडील एक तारा बनले आहेत. संगीताने हे पण सांगितल कि तिने आज पर्यंत त्यांचा गणवेश नाही धुतला, तिला जेव्हा पण नवऱ्याची आठवण येते तेव्हा ती ते घालते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *