आता आता : साऊथच्या अभिनेत्रींचे झाले निधन, गिनीज बुक मध्ये देखील आहे नाव

मित्रानो २०१८ मध्ये अनेक दिग्गज कलाकारांचं निधन झालं त्यामुळे बॉलिवूड शोक मध्ये होत. २०१९ मध्ये देखील काहींचे निधन झाल्याने बॉलिवूड शोक मध्ये आहे. नुकतेच साऊथच्या एका अभिनेत्री आणि निर्माती चे निधन दिनांक २७ जून २०१९ रोजी झाले आहे. या अभिनेत्रीने २०० पेक्षा अधिक तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच ४४ चित्रपट स्वतः डायरेक्ट केली आहेत. अश्या महान अभिनेत्रींचे नाव गिनीज बुक मध्ये देखील पोहचलेले आहे. शोकाची बाब हीच आहे कि, या महान अभिनेत्रींचे हैद्राबाद मध्ये निधन झालं.

टॉलीवुड ची गाजलेली अभिनेत्री विजया निर्मला यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं. २० जानेवारी १९४६ जन्मलेल्या या अभिनेत्रीने साऊथ चित्रपटांमध्ये नाव कमावून जगाचा निरोप घेतला. हैद्राबाद मधील कॉन्टिनेन्टल रुग्णालयात त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते मात्र त्यांनी आज याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयानुसार येणाऱ्या आजारांशी विजय लढत होत्या अशी माहिती मिळाली आहे. विजय यांच्या पार्थिवाला त्यांचं राहत घर नानकरामगुडा येथे आणलं जाणार आहे. विजया निर्मला यांच्या घरी त्यांचे पती कृष्णा आणि मुलगा नरेश राहतो तसेच महेश बाबू आणि मंजुला घट्टामनेनी हे सावत्र मुलं देखील आहेत. विजया निर्मला यांच्या मृत्यूनंतर टॉलीवुड मध्ये शोककळा पसरली आहे. टॉलीवुड चे अभिनेते, कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करून शोक व्यक्त करत आहेत तसेच सोशल मीडियावर देखील ते पोस्ट टाकून आपला शोक व्यक्त करत आहते. एक्टर मंचू मनोज ने ट्विटर वर त्यांना श्रद्धांजली देत लिहाल कि, “तुम्ही आलात, तुम्ही इतिहास घडवला आणि तुम्ही निघून गेल्या.” या अभिनेत्रींच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *