रिलायन्स जिओ मधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून हिने टाकला रस्त्यावर हातगाडा

या धकाधकीच्या जीवनात तरुण पिढीला मोठी प्रोफेशनल डिग्री आणि नामांकित कॉलेजची पदवी असावी असे त्यांचे ध्येय असते, मग चांगली नोकरी मिळायला पाहिजे आणि सात आकडी पगार असणार प्याकेज हे आजकालच्या तरुणांचे आयुष्य आहे. पण आम्ही नेहमी शोधतो असे लोक ज्यांनी समाजात चालत आलेल्या ह्या परंपरा सोडून देऊन स्वतःचा मार्ग निवडून यशाचे शिखर गाठले. अनेक लोक असे असतात ज्यांना १० ते ८ तास चालणारी ऑफिसची नौकरी आवडत नाही. राधिका अरोरा सुध्दा याच लोकात समाविष्ट आहे तिने एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक चांगल्या पगाराची नौकरी सोडून स्वतःचे काम सुरु केले आहे आणि आता आपल्या या निर्णयावर ती अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे. चला तर पाहूया राधिकाचा हा भन्नाट प्रवास….

चंडीगढ़ ग्रुप ऑफ कॉलेज मधून एमबीए झाल्यानतर राधिकाला चंदिगढ येथेच नौकरी करिता रहावे लागत होते. ती रिलायन्स जिओमध्ये चांगल्या पगारावर नोकरी करत होती पण दुसर्या गावात राहणे म्हणजे तिला एकटच वाटत होत. तिला तिथले जेवण पसंद नव्हते त्यामुळे अधिक वेळ ती बाहेरच जेवण करत होती. ती सांगते नौकरी करताना तिला एकाच गोष्टीची आठवण नेहमी यायची. ती म्हणजे आईच्या हातचा स्वयंपाक. यामुळे तिला एक मस्तच आयडिया आली ती आयडीया होती खाण्याचा हातगाडा सुरु करायची. एमबीए ची पदवी असल्याने धंद्यातील यश अपयश तिला चांगलेच कळत होते तुरंत नोकरी सोडून तिने मोहाली येथील फेज ८ या औद्योगिक भागात स्वतःचा हातगाडा लावला आणि तिच्या दुकानाचे नाव होते “मा का प्यार”.राधिकाच्या गाड्यावरील पदार्थ इतके छान चविष्ट होते कि, तिचे सर्व जेवण लोक आवडीने खायचे आणि लगेच ते संपूनही जायचे. रोज ती ७२ प्लेट पदार्थ बनवत होती, परंतु दिवसान दिवस तिच्या या हातगाड्याची लोकप्रियता वाढत गेली आणि लोकांनाहि घरच्या सारखे जेवायला मिळत होते आणि तिला यातच समाधान मिळायला लागले. तिच्या या व्यवसायाचे गुपित एकच आहे कि ती घरच्यासारखे पदार्थ बनवत होती. तिच्या हातगाड्यावर राजमा-चावल, कढी चणे भेंडी इत्यादी पदार्थ असतात. याकरिता तिने एक आचारी ठेवला जो जेवण बनवतो.राधिकाला हे सर्व करायला खूप कठीण झाले होते म्हणजेच तिची सुरुवात हि खूपच कठीण होती. स्थानिक प्रशासनाकडून. परमिशन घेऊन रस्त्यावर हातगाडा लावणारी ती पहिली आहे ज्या करिता तिला बराच वेळ लागला. यासाठी राधिकाने जवळपास १लाख रुपये गुंतवले तसेच राधिकाच्या घरचे देखील तिच्या या मतावर ठाम न्हवते. त्यांना वाटायचं आपल्या मुलीने एवढे शिक्षण घेतले आणि आता काय तर रस्त्यावर हात गाडा लावणार. परंतु राधिकाने ह्या सर्व गोष्टीवर लक्ष न देता स्वतःचा मार्ग निवडला आणि त्यामध्ये ती यशस्वी झाली. परंतु घरच्यांना वाटायचं मुलगी शिकलेली आहे आणि आता रस्त्यावर उभी राहून हातगाड्यावर काम करणार का? परंतु जेव्हा तिच्या या हातगाड्याची कमाई येणे सुरु झाली तेव्हा घरच्यांना पटले कि राधिकाचा निर्णय योग्य होता. आज अभिमानाने तिच्या घरचे तिच्या या साहसी निर्णयाबद्दल सर्वाना सांगतात.अश्या प्रसंगातून तिला यश मिळाले आणि आज राधीकाचे दोन हातगाडे आहेत. पहिला औद्योगिक एरिया मोहाली आणि दुसरा विआयपी रोड जीरक पूर येथे. तिच्या गाड्यावर पदार्थ एवढे चविष्ट असतात कि जो येतो तो राधिकाच्या वा-वा करून जातो. तिच्या ग्रुप मध्ये एकूण ५ जण काम करतात आणि या कामाकरिता राधिकाला तिच्या मित्राने खूप मदत केली. तिच्या या कार्याला तुम्ही देखिल सलाम कराल व हि पोस्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तिला शुभेच्या द्याल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *